News18 Lokmat

बाबा रामदेवांचं 'पतंजली' भारतातील टाॅप 5 प्रभावशाली ब्रँडमध्ये !

तर याच यादीत भारतात प्रत्येक जिल्ह्यात पोहचलेली स्टेट बँक ऑफ इंडिया मात्र पाचव्या स्थानावर आहे.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jul 14, 2017 06:16 PM IST

बाबा रामदेवांचं 'पतंजली' भारतातील टाॅप 5 प्रभावशाली ब्रँडमध्ये !

14 जुलै : इप्सॉस या जागतिक फर्मने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार योगगुरू बाबा रामदेव यांचा 'पतंजली' हा भारतातला टाॅप फाईव्ह ब्रँडमध्ये निवडला गेलाय. चौथ्या स्थानावर पतंजलीने झेप घेतलीये. तर याच यादीत भारतात प्रत्येक जिल्ह्यात पोहचलेली स्टेट बँक ऑफ इंडिया मात्र पाचव्या स्थानावर आहे. इप्सॉसने एकूण वीस ब्रँड्सची यादी जाहीर केलीय.

इप्सॉस या फर्मने भारतात प्रसिद्ध असणाऱ्या 100हून अधिक ब्रँन्डसवर रिसर्च केला. यात ब्रँडसची क्वालिटी, अनुभव आणि व्हॅल्यू असे तीन निकष लावण्यात आले. या रिसर्चसाठी 1000हून अधिक भारतीयांना ब्रँडसबद्दल प्रश्नही विचारले गेले.

या निकषांच्या आधारे जाहीर झालेल्या लिस्टमध्ये गुगल हा सर्वात प्रभावशाली ब्रँड ठरलाय तर मायक्रोसॉफ्ट,फेसबुकची त्याच्या खालोखाल वर्णी लागलीय.

हे आहेत टाॅप 20 ब्रँड

1. गुगल

Loading...

2. मायक्रोसोफ्ट

3. फेसबुक

4. पतंजली

5. स्टेट बँक ऑफ इंडिया

6. अॅमेझॉन

7. सॅमसंग

8. एयरटेल

9. जिओ

10.फ्ल्पिकार्ट

11.स्नॅपडील

12.अॅपल

13.डेटॉल   

14.कॅडबरी

15.सोनी

16.एच.डी.एफ.सी

17.मारूती

18.गुड डे

19.आयफोन

20.अमुल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 14, 2017 06:16 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...