पीएनबी घोटाळ्याचा सुत्रधार नीरव मोदीचा पासपोर्ट रद्द !

ईडीनेच नीरव मोदीचा पासपोर्ट रद्द करण्याची मागणी परराष्ट्र मंत्रालयाला केली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Feb 16, 2018 05:17 PM IST

पीएनबी घोटाळ्याचा सुत्रधार नीरव मोदीचा पासपोर्ट रद्द !

15 फेब्रुवारी: तब्बल 11 हजार 350 कोटींचा घोटाळा करणारा आणि देशाबाहेर फरार होणाऱ्या नीरव मोदीचा पासपोर्ट परराष्ट्र मंत्रालयाने रद्द केला आहे. याआधी कालच नीरव मोदीविरूद्ध लुक आऊट नोटीस सीबीआयने काढली होती.

नीरव मोदीने गेल्या आठ वर्षा पंजाब नॅशनल बॅँकेत तब्बत 11 हजारहून जास्त कोटींचा घोटाळा केला. एवढंच नाही तर अजून 17 बॅँकांनीही त्याने चुना लावला आहे. नीरव  मोदी यांच्या मालाडच्या घरावरही ईडीचे छापे पडले  आहेत.ईडीनेच नीरव मोदीचा पासपोर्ट रद्द करण्याची मागणी परराष्ट्र मंत्रालयाला केली होती. त्यानुसार ही  कारवाई करण्यात आली आहे. हा घोटाळा करण्यासाठीही नीरव मोदीने 'लेटर ऑफ अंडरस्टँडिंग'चाच वापर केल्याचं समोर आलंय.  नीरव मोदीनं केलेल्या फसवणुकीमुळे १७ बँकांचे सुमारे ३ हजार कोटी बुडाल्यात जमा आहेत.  नीरव मोदीसोबत मेहुल चोकसीचाही पासपोर्ट रद्द करण्यात आला आहे.

भारतीय बॅँकेना गंडा घालून नीरव मोदी आता स्वित्झरलॅंडला फरार झाला आहे. याआधी विजय माल्या दीपक तलवार देखील अशाच प्रकारे फरार झाले होते. त्यामुळे  आता नीरव मोदीवर सरकार काय कारवाई करतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 16, 2018 04:13 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...