भारतातल्या विमानप्रवासासाठी आता लागणार पासपोर्ट किंवा आधारकार्ड

आता लवकरच भारतात विमान प्रवास करायचा असेल तरीही पासपोर्ट किंवा आधार कार्ड लागणार आहे.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Apr 9, 2017 01:14 PM IST

भारतातल्या विमानप्रवासासाठी आता लागणार पासपोर्ट किंवा आधारकार्ड

09 एप्रिल : आता लवकरच भारतात विमान प्रवास करायचा असेल तरीही पासपोर्ट किंवा आधार कार्ड लागणार आहे.केंद्र सरकार याचा सध्या मसुदा तयार करतंय. रवींद्र गायकवाड प्रकरणानंतर सरकारनं हे काम आणखी लवकर पूर्ण करायचं ठरवलंय.

अपघात झाला किंवा विमानात कुणी गैरवर्तन केलं, किंवा इतर प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण केला, तर त्या प्रवाशाची ओळख हवी.आणि त्याचा पत्ता, फोन नंबर हवं. तिकीट बुक करताना आपण हे सगळे डिटेल्स देतोच.पण त्याची पडताळणी होत नाही. त्यामुळे खोटा पत्ता देण्याच्या घटनाही घडतात.या सगळ्याला आळा घालण्यासाठी सरकारनं हा निर्णय घेतलाय.

तिकीट बुक करताना पासपोर्ट क्रमांक सक्तीचा करायचा की आधार क्रमांक, हे अजून ठरलेलं नाही.लवकरच जनतेची मतं नागरी उड्डाण मंत्रालयाच्या वेबसाईटवरून मागवता येणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 9, 2017 01:14 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...