विदेशातून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांना आता क्वारंटाइनमध्ये सुट, पण एका अटीवरच!

विदेशातून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांना आता क्वारंटाइनमध्ये सुट, पण एका अटीवरच!

या आधी विदेशातून येणाऱ्या प्रवाशांना 7 दिवस संस्थात्मक आणि 7 दिवस घरातच क्वारंटाइन व्हाव लागत होतं.

  • Share this:

नवी दिल्ली 13 ऑगस्ट: विदेशातून मुंबई येणाऱ्या प्रवाशांना (International Passengers) आता मोठी सुट देण्यात आली आहे. हवाई वाहतूक मंत्रालयाने याबाबत गुरुवारी एक निर्णय घेतला असून त्यामुळे मुंबईत येणाऱ्या शेकडो प्रवाश्यांना दिलासा मिळणार आहे. आत या प्रवाशांना संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये(Institutional Quarantine) राहावं लागणार नाही. विदेशातून येणारे बहुतांश नागरीक हे तातडीच्या कामानिमित्त (Emergency Reasons) परत येत आहेत. त्यांना या नियमांमुळे मोठी अडचण येत होती त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. पण त्यासाठी या प्रवाशांना आपली कोविड टेस्ट झाल्याचं प्रमाणपत्र दाखवावं लागणार आहे.

या प्रवाशांना आपली कोविड टेस्ट झाली आहे याचं प्रमाणपत्र दाखवावं लगाणार आहे. ही टेस्ट 96 तासांपूर्वी झालेली असावी अशी अट घालण्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारनेही नियमांमध्ये सुट दिली होती.

या आधी विदेशातून येणाऱ्या प्रवाशांना 7 दिवस संस्थात्मक आणि 7 दिवस घरातच क्वारंटाइन व्हाव लागत होतं. आता संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये सुट देण्यात आली आहे. मात्र घरात 7 दिवस क्वारंटाइन राहावं लागेल.

15 ऑगस्टवर आसमानी संकट, 5 दिवसांसाठी हवामान खात्याचा इशारा

राज्यात आज पहिल्यांदाच सर्वात जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासांमध्ये तब्बल 413 जणांचा मृत्यू झाला. राज्याचा मृत्यू दर हा 3.4 टक्के एवढा असून तो देशाच्या सरासरीपेक्षा जास्त आहे. राज्यात आज 11 हजार 813 नवीन रुग्ण आढळून आलेत. त्यामुळे रुग्णांची एकूण संख्या ही 5 लाख 60 हजार 126 एवढी झाली आहे.

राज्यात आज नऊ हजार 115 रुग्ण बरे झाले असून आत्तापर्यंत एकूण 3 लाख 90 हजार 958 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 69.8 टक्के इतका आहे.

पार्थ पवारांनी घेतली शरद पवारांची भेट, नाराजी व्यक्त केल्यानंतर पहिलीच चर्चा

राज्यात आज दहा लाख 25 हजार 660 व्यक्ती घरात विलगीकर मध्ये आहेत, तर 36 हजार 450 संस्थात्मक विलगीकरण आहेत. राज्यात एकूण एक लाख 49 हजार 798 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.

Published by: Ajay Kautikwar
First published: August 13, 2020, 9:11 PM IST

ताज्या बातम्या