नवी दिल्ली, 31 ऑगस्ट : देशभरात सुरू असलेल्या कोरोनाच्या कहरामुळे सर्वांनाच मोठा फटका सहन करावा लागत आहे. शिक्षण क्षेत्रातील विद्यार्थ्यांचं यामुळे नुकसान होण्याची भीती आहे. अशातच केरळमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे,
केरळमध्ये नोकरी न मिळाल्यामुळे त्रस्त विद्यार्थ्याने आत्महत्या (Suicide) केली आहे. इतकच नाही तर लोकसेवा आयोगाच्या यादीत विद्यार्थ्याचं नाव आल्यानंतरही त्याने गळफास लावून आत्महत्या केली. योग्यता यादीत नाव आल्यानंतरही ती यादी सरकारकडून रद्द करण्यात आली होती. तरुणाच्या आत्महत्येमुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. तरुणाच्या मृतदेहाजवळ एक सुसाईट नोट सापडली. यावरुन त्याने बेरोजागारीला कंटाळून टोकाचं पाऊल उचलल्याची बाब समोर आली आहे. या प्रकरणानंतर तरुणांकडून राग व्यक्त केला जात आहे.
हे वाचा-Covid रुग्णालयात उपचार घेणारा SP नेता रुग्णालयातून पळाला; पुलावरुन मारली उडी
तरुणाकडून एक सुसाइट नोट सापडली आहे. ज्यामध्ये त्याने लिहिलं आहे की, मी जीवनाला कंटाळलो आहे. मी कोणासमोरही आनंदी राहू शकत नाही. याचं एकचं कारण आहे की मी बेरोजगार आहे. या घटनेनंतर आमदार सीके हरींद्रन तरुणाच्या घरी पोहोचले तेव्हा त्याच्या घराबाहेर मोठी गर्दी होती. पीएससी लिस्ट रद्द केल्यामुळे धक्का सहन न झाल्याने तरुणाने टोकाचं पाऊल उचललं. यानंतर युवा मोर्चाच्या काही कार्यकर्त्यांनी आमदारांना धक्का-बुक्की केल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर काही सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पीएससीची नियुक्ती मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्याद्वारे कंट्रोल केली जाते. या प्रकारानंतर राज्यात विविध ठिकाणी तरुणांनी विरोध केला. तरुणांच्या अनेक गटाने राज्यातील विविध भागांमध्ये सरकारविरोधात आंदोलने केली व आपला राग व्यक्त केला.