पणजी विधानसभा पोटनिवडणुकीत मनोहर पर्रिकरांचा विजय

पणजी विधानसभा पोटनिवडणुकीत मनोहर पर्रिकरांचा विजय

ही निवडणूक जिंकल्यावर मनोहर पर्रिकर यांनी राज्यसभेतील खासदारपदाचा पुढच्या आठवड्यात राजीनामा देणार असल्याचं सांगितलं.

  • Share this:

पणजी,28 ऑगस्ट: पणजी विधानसभा पोटनिवडणुकीत मनोहर पर्रिकरांचा 4803 मतांनी विजय झाला आहे. गोव्यामध्ये  दोन जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर भाजपने शिक्कामोर्तब केला आहे.

तीन राज्यातील चार विधानसभेच्या जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीची मतमोजणी आज सकाळी सुरू झाली.यामध्ये गोव्यातील दोन दिल्लीतील एक आणि आंध्र प्रदेशमधील एक जागा आहे. गोव्यातील दोन्ही जागा भाजपने काबीज केल्या आहेत. पणजीहून मनोहर पर्रिकर जिंकले आहेत तर वलपोईत गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे तब्बल 10,107 मतांनी  जिंकले आहेत. ही निवडणूक जिंकल्यावर मनोहर पर्रिकर यांनी राज्यसभेतील खासदारकीचा पुढच्या आठवड्यात राजीनामा देणार असल्याचं सांगितलं.

दरम्यान, दिल्लीतील बवानाच्या आणि आंध्र प्रदेशच्या नंद्यालाच्या निकालांचे चित्र स्पष्ट झाले असून दिल्लीच्या बवानामध्ये आपचे उमेदवार राम चंदर जिंकले असून तेलुगू देसम पार्टीचे भूमा ब्रम्हानंद रेड्डी हे नंद्यालमध्ये जिंकले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 28, 2017 10:36 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading