मराठी बातम्या /बातम्या /देश /संसदेच्या अधिवेशनावर कोरोनाचं सावट, कालावधी कमी होण्याची शक्यता

संसदेच्या अधिवेशनावर कोरोनाचं सावट, कालावधी कमी होण्याची शक्यता

New Delhi: Security staff is seen at Parliament House during a nationwide lockdown in the wake of coronavirus pandemic, in New Delhi, Monday, April 20, 2020. (PTI Photo/Ravi Choudhary)(PTI20-04-2020_000064B)

New Delhi: Security staff is seen at Parliament House during a nationwide lockdown in the wake of coronavirus pandemic, in New Delhi, Monday, April 20, 2020. (PTI Photo/Ravi Choudhary)(PTI20-04-2020_000064B)

अधिवेशन सुरू होण्याआधी प्रत्येक खासदार आणि मंत्र्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यात 25 खासदार पॉझिटिव्ह निघाले होते.

नवी दिल्ली18 सप्टेंबर: देशात कोरोनाचं संकट असतांनाच संसदेचं अधिवेशन होत आहे. या अधिवेशनात कोरोनाचा प्रसार लक्षात घेता सर्व खबरदारी घेण्यात येत आहे. मात्र खासदार आणि मंत्री कोरोना संक्रमित होत असल्याने अधिवेशनाचा कालावधी कमी होऊ शकते अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. 14 सप्टेंबरला संसदेचं अधिवेशन सुरू झालंय. ते 1 ऑक्टोंबरपर्यंत चालणार आहे. मात्र कोरोनाचं संकट लक्षात घेता अधिवेशन आठवडाभराने कमी करण्यात येऊ शकते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि प्रल्हाद पटेल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.

तर काही खासदारही कोरोना बाधित झाल्याचं आढळून आलं आहे. त्यामुळे कालावधी कमी करण्याबाबत विचार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अधिवेशन सुरू होण्याआधी प्रत्येक खासदार आणि मंत्र्यांची चाचणी करण्यात आली होती. त्यात 25 खासदार पॉझिटिव्ह निघाले होते.

यावेळी कामकाज करतांना अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत. खबरदारी घेण्यात येत आहे. मात्र प्रसार थांबत नसल्याने सरकारचीही चिंता वाढली आहे. सकाळ आणि संध्याकाळ असं कामकाज होत असून खसादारांना कोरना सुरक्षा नियमांचं पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

एअर इंडियाचा निष्काळजीपण; कोरोना पॉझिटिव्ह प्रवाशाला जयपूरहून दुबईला नेलं

दरम्यान, कोविडच्या पार्श्वभूमीवर सर्व खासदारांचं 30 टक्के वेतन कपात करण्यात येणार आहे. वर्षभर ही कपात होणार असून त्याबाबतचं विधेयक मंजूर करण्यात आलं आहे. संसदेच्या सलग 18 बैठका पार पडती, ज्यामध्ये 45 विधेयक आणि 11 अध्यादेश आणले जातील. संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज आठवड्याच्या 7 ही दिवशी होईल.

BREAKING : पत्रकारचं निघाला चीनचा गुप्तहेर, पोलिसांच्या विशेष पथकाकडून अटक

यावेळी आठवड्याची सुट्टी मिळणार नाही. दररोज 4 तास दोन्ही सत्रांचं कामकाज सुरू असेल. राज्यसभा सकाळी 9 ते दुपारी 1 या वेळेत पार पडणार, तर लोकसभा संध्याकाळी 3 ते सायंकाळी 7 या वेळेत असेल अशी माहिती देण्यात आली आहे.

First published:

Tags: Coronavirus, Parliament session