Monsoon Session : अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राहुल गांधी गायब; भाजपनं केलं लक्ष्य

Monsoon Session : संसदेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये राहुल गांधी यांची गैरहजेरी असल्यानं आता भाजपनं त्यावर सवाल केले आहेत.

News18 Lokmat | Updated On: Jun 17, 2019 01:41 PM IST

Monsoon Session : अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राहुल गांधी गायब; भाजपनं केलं लक्ष्य

नवी दिल्ली, 17 जून : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज पहिला दिवस. डॉ. वीरेंद्र कुमार यांच्याकडे लोकसभेच्या हंगामी सभापतीपदाची जबाबदारी देण्यात आली. वीरेंद्र कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह सर्व नवनिर्वाचित खासदारांना शपथ दिली . दरम्यान, यावेळी काँग्रेसचे अध्यक्ष आणि वायनाडचे नवनिर्वाचित खासदार राहुल गांधी आहेत कुठे? असा सवाल विचारण्यात येत आहे. राहुल गांधी यांच्या गैरहजेरीवर भाजप खासदारांनी देखील काही सवाल केले. भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी देखील राहुल गांधी यांच्या गैरहजेरीवर सवाल केले. भारतीय लोकशाहीवर राहुल गांधी यांचा विश्वास आहे का? असा सवाल देखील यावेळी अमित मालवीय यांनी केला. वायनाड येथे झालेल्या रॅलीनंतर राहुल गांधी थेट परदेश दौऱ्याला निघून गेले आहेत. प्रसारमाध्यमांच्या मते राहुल गांधी लंडनला गेले आहेत. पण, काँग्रेसनं यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. तर, दुसरीकडे राहुल गांधी परदेश दौऱ्यावरून आज परत येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली 'न्यूज18 नेटवर्क'ला दिली आहे.


संसदेत मोदींना शपथ देणारे 'हे' नेते एकेकाळी करायचे पंक्चर काढण्याचं काम

राहुल गांधी यांची राजीनाम्याची तयारी

लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी राजीनाम्याची तयारी दर्शवली होती. पण, काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांना राजीन्यापासून रोखलं. भाजपप्रणित NDAनं मिळवलेल्या यशानंतर सध्या लोकसभेत विरोधी पक्ष कोण असा सवाल आहे ? कारण देशातील सर्वात जुना पक्ष असलेल्या काँग्रेसचं संख्याबळ खूपच कमी आहे. त्यामुळे विरोधीपक्ष कोण ? असा सवाल देखील विचारला जात आहे.

Loading...

राहुल गांधी यांचा अल्टिमेटम

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी अध्यक्षपदासाठी दुसऱ्या व्यक्तिची निवड करा असं सांगितलं आहे. शिवाय, एक महिन्याचा अल्टिमेटम देखील दिला आहे. सध्या राहुल गांधी काँग्रेसच्या कोणत्याही सभेला हजेरी लावताना दिसत नाहीत. ए. के. अ‍ॅन्टोनी सध्या राहुल गांधी गैरहजेरीमध्ये कारभार सांभाळत आहेत. त्यांची अध्यक्षपदी निवड होऊ शकते अशी देखील एक चर्चा आहे.


Indian Jugad : नारळाच्या झाडावर चढण्यासाठी शोधून काढली ही भन्नाट स्कूटर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 17, 2019 01:40 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...