Monsoon Session : आता हे दिग्गज नेते दिसणार नाहीत लोकसभेत

Monsoon Session : 17व्या लोकसभेचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू झालंय. पण, यापूर्वी संसदेचं सभागृह गाजवणारे काही दिग्गज मात्र आता सभागृहात दिसणार नाहीत.

News18 Lokmat | Updated On: Jun 17, 2019 12:26 PM IST

Monsoon Session : आता हे दिग्गज नेते दिसणार नाहीत लोकसभेत

पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात झाली आहे. अधिवेशनामध्ये तिहेरी तलाकसह काही महत्त्वाच्या बिलांवर या अधिवेशनामध्ये चर्चा होणार आहे. सोळाव्या लोकसभेमध्ये असणारे काही महत्त्वाचे आणि मोठे चेहरे मात्र या अधिवेशनामध्ये दिसणार नाहीत.

लालकृष्ण अडवाणी यांनी गांधी नगर  लोकसभा मतदारसंघातून सलग 5 वेळा विजय मिळवला होता. 1991मध्ये त्यांनी पहिला विजय मिळवला.  पण, यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये मात्र त्यांना पक्षानं तिकीट न देता अमित शहा यांना तिकीट दिलं.

2009मध्ये मुरली मनोहर जोशी यांनी वाराणसीमधून विजय मिळवला होता. पण, 2014मध्ये त्यांना कानपूरमधून निवडणूक लढण्यास सांगत वाराणसीमधून नरेंद्र मोदी यांनी निवडणूक लढवली. पण, यंदा मात्र त्यांना उमेदवारी देण्यात आली नाही. 1996, 1998, 1999मध्ये त्यांनी इलाहाबादमधून निवडणूक लढवली आणि ते विजयी झाले.

Loading...

2014च्या मोदी सरकारमध्ये उमा भारती केंद्रीय मंत्री होत्या. पण, 2019मध्ये त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली नाही.

माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांना 2019मध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. तुमकूर या लोकसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली होती.

योगी आदित्यनाथ सोळाव्या लोकसभेमध्ये खासदार होते. पण, त्यांच्यावर आता उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी आहे.

बिहारच्या मधुबनीमधून हुकूमदेव नारायण यादव हे भाजपचे खासदार होते. पण, 2019मध्ये भाजपनं या ठिकाणावरून त्यांचा मुलगा अशोक यादव यांना उमेदवारी दिली. त्यामुळे हुकूमदेव नारायण यादव यापुढे संसदेमध्ये दिसणार नाहीत.

यापूर्वी इंदौरमधून सुमित्रा महाजन यांनी विजय मिळवला होता. 2014मध्ये महाजन यांनी लोकसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देखील सांभाळली. पण, 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये मात्र भाजपनं त्यांना उमेदवारी नाकारली.

2009 आणि 2014मध्ये सुषमा स्वराज या मध्य प्रदेशातील विदिशामधून खासदार म्हणून निवडणूक आल्या आहेत. पण, त्यांनी यापुढे निवडणूक लढणार नाही अशी घोषणा केली. त्यामुळे यापुढे त्या संसदेत दिसणार नाहीत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 17, 2019 12:26 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...