मोदी सरकारची पहिल्यांदाच लोकसभेत परिक्षा, अविश्वास प्रस्ताव दाखल

मोदी सरकारची पहिल्यांदाच लोकसभेत परिक्षा, अविश्वास प्रस्ताव दाखल

आज संसदेत पावसाळी अधिवेशनाला सुरूवात झाली आहे. हे सत्र 18 जुलै ते 10 ऑगस्टपर्यंत चालणार आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 18 जुलै : आज संसदेत पावसाळी अधिवेशनाला सुरूवात झाली आहे. हे सत्र 18 जुलै ते 10 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. पण यात केंद्र सरकार विरोधात करण्यात आलेला अविश्वास ठराव लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी मंजूर केला आहे. टीडीपीने केंद्र सरकार विरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता त्याला काँग्रेस सह इतर विरोधी पक्षांचा पाठिंबा होता. त्यामुळे आता पहिल्यांदाच सदनात मोदी सरकारची परीक्षा होणार आहे. नियमानुसार १० दिवसांत अविश्वास प्रस्ताव सादर करण्याची मुदत देण्यात आली आहे.

दरम्यान, केंद्र सरकारनेही या परिक्षेसाठी तयार असल्याचं सांगितलं आहे. केंद्र सरकारला लोकसभेत बहुमत मिळण्याचा विश्वास आहे. पण सुमित्रा महाजन यांच्याकडून अद्याप तारिख देण्यात आलेली नाही. लोकसभेत सरकारविरोधात 8 अविश्वास ठराव सादर करण्यात आले होते. त्यात लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी टीडीपीने सादर केलेल्या अविश्वास ठरावाला मंजूरी दिली आहे.

 

 

First published: July 18, 2018, 12:50 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading