बातमी वाचून तुमच्या खासदाराचा अभिमान वाटेल; संसदेत 20 वर्षानंतर असं झालं!

बातमी वाचून तुमच्या खासदाराचा अभिमान वाटेल; संसदेत 20 वर्षानंतर असं झालं!

17व्या लोकसभेच्या पहिल्या सत्रात कामगिरीच्या दृष्टीने खासदारांनी अनेक विक्रम केले. आकडेवारीच्या माध्यमातून जाणून घेऊयात खासदाराची कामगिरी...

  • Share this:

नवी दिल्ली, 07 ऑगस्ट: लोकप्रतिनिधी मग खासदार असो की आमदार सभागृहातील त्यांची कामगिरी फार चांगली असतेच असे नाही. काही मोजके लोकप्रतिनिधी सभागृहात बोलतात, चर्चेत भाग घेतात आणि प्रश्न विचारतात. अनेकवेळा जनतेचे प्रश्न सोडवण्यापेक्षा लोकप्रतिनिधी सभागृहता गदारोळ करताना दिसतात. नुकतेच 17व्या लोकसभेचे पहिले सत्र पार पाडले. या सत्रात सर्व खासदारांनी मिळून एक नवा विक्रमच केला आहे. खासदारांची ही कामगिरी पाहून तुम्हाला नक्कीच अभिमान वाटेल. 17व्या लोकसभेच्या पहिल्या सत्रात कामगिरीच्या दृष्टीने खासदारांनी अनेक विक्रम केले. आकडेवारीच्या माध्यमातून जाणून घेऊयात खासदाराची कामगिरी...

>17व्या लोकसभेच्या पहिल्या सत्रात 281 तास कामकाज झाले. यातील 46 टक्के वेळ हा विधायक कामाच्या चर्चेसाठी वापरला गेलाय

> गेल्या 20 वर्षात प्रथमच इतका वेळ सभागृहाचे कामकाज झाले आहे.

> या कामकाजा दरम्यान 36 टक्के प्रश्न सभागृहातच विचारले गेले.

> 17 व्या लोकसभेच्या पहिल्या सत्रात 28 विधेयके सादर करण्यात आली आणि ही सर्व विधेयके मंजूर देखील झाली. विशेष म्हणजे यातील एकही विधयेक कोणत्याही समितीकडे पाठवण्यात आले नाही.

> पहिल्यांदाच खासदार झालेल्या लोकप्रतिनिधींनी या सत्रात 94 टक्के उपस्थिती दाखवली. जर ज्या महिला पहिल्यांदा खासदार झाल्या त्यांची उपस्थिती 96 टक्के इतकी होती.

VIDEO : सांगलीत तुरुंगाला पुराचा वेढा, 400 कैद्यांना हलवणार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 7, 2019 07:09 PM IST

ताज्या बातम्या