S M L

आता मतदान केल्यावर मिळणार पावती

2019 च्या लोकसभा निवडणुकीत ईव्हीएम मशीनमध्ये मतदान केल्यानंतर तुम्हाला पावती मिळणार

Sachin Salve | Updated On: Apr 19, 2017 04:27 PM IST

आता मतदान केल्यावर मिळणार पावती

19 एप्रिल : ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार झाल्याचा संशयकल्लोळ उडाल्यानंतर अखेर निवडणूक आयोगाने अधिक पारदर्शकता आणण्यासाठी नवे पाऊल उचलले आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत ईव्हीएम मशीनमध्ये मतदान केल्यानंतर तुम्हाला पावती मिळणार आहे.

पाच राज्यांच्या निवडणुकीत ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार केल्याचे आरोप झाला. एवढंच नाहीतर ईव्हीम मशीन बंद करा आणि जुन्या पद्धतीने मतदान करा अशी मागणी विरोधकांनी केली. निवडणूक आयोगानेही ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार करून दाखवाच असं जाहीर आव्हान केलं.

आज निवडणूक आयोगाने व्हीव्हीपेट मशीन खरेदीसाठी 3 हजार 174 कोटींची मागणी केली होती त्याला कॅबिनेट मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. ईव्हीएम मशीनवर संशय व्यक्त केल्यामुळे  केंद्र सरकारनेही निवडणूक आयोगाला पत्र लिहून 2019 लोकसभा निवडणुकीत VVPAT मशीनचा वापर करावा अशी मागणी केली होती.

VVPAT मशीन म्हणजे काय ?

VVPAT म्हणजे वोट व्हेरिफिकन पेपर आॅडिट ट्रेल असं म्हणतात. ही मशीन ईव्हीएमला जोडलेली असते. मतदार जेव्हा ईव्हीएममध्ये मतदान करतो तेव्हा त्याला आपण कुणाला मतदान केलं याची एक पावती मिळेल.  मतमोजणीच्या वेळी ईव्हीएम मशीन खराब झाल्याचे प्रकार घडले. त्यामुळे फेरमतमोजणी होत होती. आता या  VVPAT मशीनद्वारे दिलेल्या पावतीच्या आधाराचे परत मतमोजणी करण्यास सोप जाईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 19, 2017 04:27 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close