लोकप्रतिनिधींसाठी 65 रुपयांत मिळायची शाही बिर्याणी! आता मोजावी लागेल वाढीव किंमत, संसदेच्या कँटीनचं जेवण महागलं!

लोकप्रतिनिधींसाठी 65 रुपयांत मिळायची शाही बिर्याणी! आता मोजावी लागेल वाढीव किंमत, संसदेच्या कँटीनचं जेवण महागलं!

संसद भवनाच्या (Parliament House) कॅन्टीनमध्ये (Canteen) खासदारांना (MP) देण्यात येणारी सबसिडी (Subsidy) नुकतीच बंद करण्यात आली आहे. त्यामुळे आता संसदेतील कॅन्टीनमधील खाद्यपदार्थांचं शुल्क वाढवण्यात आलं (rate increase) आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 27 जानेवारी: संसद भवनाच्या (Parliament House) कॅन्टीनमध्ये (Canteen) खासदारांना (MP) देण्यात येणारी सबसिडी (Subsidy) नुकतीच बंद करण्यात आली आहे. त्यामुळे आता संसदेतील कॅन्टीनमधील खाद्यपदार्थांचं शुल्क वाढवण्यात आलं (rate increase) आहे. संबंधित खाद्यपदार्थांच्या शुल्काची नवीन यादी (New  rate card) लोकसभा सचिवालयाने जाहीर केली आहे. या नवीन शुल्काची अंमलबजावणी 29 रोजी सुरू होणाऱ्या अधिवेशनापूर्वी लागू करण्यात येणार आहे. त्यामुळे या अधिवेशनादरम्यान खासदारांना या नवीन शुल्काप्रमाणे जेवण मिळणार आहे.

संसद भवनात मिळणाऱ्या खाद्यपदार्थांच्या किमती वाढल्या असल्या तरी या किमती बाजारभावाच्या तुलनेत कमीच आहेत. नवीन यादीनुसार सर्वात स्वस्त पदार्थ हा चपाती असून त्याची किंमत 3 रुपये आहे. तर या कॅन्टीनमध्ये मिळणारा सर्वात महागडा पदार्थ हा बुफे पद्धतीचं मासांहारी जेवण असून त्याची किंमत 700 रुपये आहे. यासोबतच शाखाहारी बुफे पद्धतीच्या जेवणासाठी खासदारांना 500 रुपये मोजावे लागणार आहेत.

यापूर्वी एका चपातीची किंमत 2 रुपये होती, तर हैदराबादी चिकन बिर्याणी अवघ्या 65 रुपयांना मिळत होती. आता नवीन शुल्कानुसार चपाती 3 रुपयांना आणि चिकन बिर्याणी, चिकन कटलेट, चिकन फ्राय हे पदार्थ प्रत्येकी 100 रुपयांना मिळणार आहेत. त्याचबरोबर मटन बिर्याणी आणि मटन कटलेटसाठी 150 रुपये मोजावे लागणार आहेत, तर मटन करीसाठी 125 रुपये आकरले जाणार आहेत.

जुन्या शुल्काच्या तुलनेत काही पदार्थांच्या किंमती 30 ते 35 टक्क्यांनी वाढल्या आहेत. तर इतर काही पदार्थांत किरकोळ वाढ करण्यात आली  आहे. या नवीन दरवाढीमुळे लोकसभा सचिवालयाचे दरवर्षी 8 करोड रुपये वाचणार आहेत. या कॅन्टीनमधील पदार्थांचा वर्षाला एकूण खर्च 20 कोटी येतो. त्यामुळे नवीन शुल्क यादीनुसार पदार्थांच्या किमती किरकोळ वाढवल्या असल्या तरी संसद सचिवालयाची मोठी रक्कम वाचणार आहे.

Published by: News18 Desk
First published: January 27, 2021, 7:02 PM IST
Tags: parliament

ताज्या बातम्या