मुलाच्या काळजीत असलेल्या आईला मोदींनी विचारलं PUBGवाला आहे का?

मुलाच्या काळजीत असलेल्या आईला मोदींनी विचारलं PUBGवाला आहे का?

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज ( 29 जानेवारी )ला 'परीक्षा पे चर्चा'मध्ये विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांच्या प्रश्नांना उत्तरं दिली. यावेळी मोदींच्याच एका प्रश्नावर सभागृहात हास्याची लहर उमटली.

  • Share this:

नवी दिल्ली, 29 जानेवारी : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज ( 29 जानेवारी )ला 'परीक्षा पे चर्चा'मध्ये विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांच्या प्रश्नांना उत्तरं दिली. यावेळी मोदींच्याच एका प्रश्नावर सभागृहात हास्याची लहर उमटली.

एका मुलाच्या आईनं मोदींना विचारलं, अगोदर मुलगा अभ्यास करायचा. पण आता आॅनलाइन गेम्स खेळतो. त्यामुळे अभ्यासात कमी लक्ष देतोय. त्यावर मोदींनी उत्स्फूर्तपणे विचारलं,  हा PUBGवाला आहे का?

यानंतर पंतप्रधान म्हणाले, ' मुलांनी खेळ खेळणं ही एक समस्याही आहे आणि समाधानही. आपला मुलगा टेक्नाॅलाॅजीपासून दूर गेला, तर त्याला मागे पाडल्यासारखं होईल. पण तंत्रज्ञानाचा कसा उपयोग करून घ्यायचा, हे महत्त्वाचं आहे. टेक्नाॅलाॅजीमुळे मुलांमधलं माणूसपण वाढलं पाहिजे. ते यंत्रमानव बनता कामा नये. तुम्ही त्याच्याशी बोला. म्हणजे  ते योग्य दिशेनं पुढे जातील आणि त्यांना विश्वास वाटेल की तुम्ही त्यांच्या सोबत आहात.'

मोदी पुढे म्हणाले, ' आई-वडिलांना वाटतं अभ्यास करायला हवा. पण त्याचबरोबर खेळायलाही हवं. नाही तर मुलगा आजारी पडेल. मैदानात खेळायला हवं. तंत्रज्ञान महत्त्वाचं पण ते शिरजोर होऊ देऊ नका.'

'परीक्षा पे चर्चा' कार्यक्रमातील मोदींचा UNCUT VIDEO

First published: January 29, 2019, 5:40 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading