लोकसभा 2019: परेश रावल निवडणूक लढवणार नाहीत, कारण...

भाजपचे गुजरातमधील खासदार आणि अभिनेते परेश रावल यांनी यंदा लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

News18 Lokmat | Updated On: Mar 23, 2019 04:46 PM IST

लोकसभा 2019: परेश रावल निवडणूक लढवणार नाहीत, कारण...

नवी दिल्ली, 23 मार्च: भाजपचे गुजरातमधील खासदार आणि अभिनेते परेश रावल यांनी यंदा लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. परेश रावल यांनी twitterवरुन ही माहिती दिली. 2014च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी गुजरातमधील अहमदाबाद येथून निवडणूक लढवली होती. दरम्यान भाजपने आतापर्यंत लोकसभेच्या ३ याद्या जाहीर केल्या असून त्यात 238 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे.

twitterवरुन लोकसभा निवडणुकीसंदर्भात घोषणा करताना रावल म्हणाले, मी प्रसारमाध्यातील माझ्या मित्रांना विनंती करतो की माझ्या उमेदवारीसंदर्भात कोणत्याही प्रकारचे अंदाज व्यक्त करु नका. मी पक्षाला याआधीच सांगितले आहे की यंदा निवडणूक लढवणार नाही. पण पक्षाचा एक सदस्य आणि पंतप्रधान मोदींचा समर्थक असेन असे त्यांनी म्हटले आहे.




Loading...

लोकसभा निवडणुक 2019

लोकसभा निवडणुकांच्या (LokSabha Elections 2019) तारखा जाहीर झाल्या आहेत. देशभरात सात टप्प्यांमध्ये 11 एप्रिल ते 19 मे यादरम्यान निवडणुका होतील. नवी दिल्लीमध्ये रविवारी निवडणूक आयोगाने (Election Commission) या तारखांची घोषणा केली. देशात सात टप्प्यांत तर महाराष्ट्रात चार टप्प्यांत लोकसभा निवडणुका होतील.


11 एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रात 7 जागांसाठी मतदान होणार-

वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा- गोदिया, गडचिरोली- चिमूड, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम

18 एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील 10 जागांवर होणार मतदान-

बुलडाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर

23 एप्रिल रोजी तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील 14 जागांवर होणार मतदान

जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, रायगड, पुणे, बारामती, अहमदनगर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदूर्ग, कोल्हापूर, हातकणंगले

29 एप्रिल रोजी चौथ्या टप्प्यात महाराष्ट्रातील 17 जागांवर होणार मतदान

नंदूरबार, धुळे दिंडोरी, नाशिक, पालघर, भिंवडी, कल्याण, ठाणे, मुंबई- उत्तर, मुंबई- उत्तर- पश्चिम, मुंबई -उत्तर - पूर्व, मुंबई- उत्तर -मध्य, मुंबई - दक्षिण - मध्य, मुंबई- दक्षिण, मावळ, शिरूर, शिर्डी

लोकसभा निवडणूक 2014

महाराष्ट्रात 2014 च्या निवडणुकीत भाजप - शिवसेना युती आणि काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडी अशी सरळ स्पर्धा होती. राज्यातल्या लोकसभेच्या 48 जागांपैकी 41 जागा राष्ट्रीय लोकशाही आघाडीने अर्थात भाजप- सेना युतीने जिंकल्या आणि काँग्रेस आघाडीचा सपशेल पराभव झाला. काँग्रेसला फक्त 2 जागा जिंकता आल्या तर राष्ट्रवादीने केवळ 4 जागा राखल्या.

महाराष्ट्र 2014 चं पक्षीय बलाबल

एकूण जागा 48

भाजप 23

सेना 18

राष्ट्रवादी काँग्रेस 4

काँग्रेस 2

स्वाभिमानी शेतकरी पक्ष 1



VIDEO: निवडणुकीआधीच अशोक चव्हाणांच्या 'या' ऑडिओ क्लीपने उडाली खळबळ



बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 23, 2019 04:43 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...