गुजरातमधील बाळाच्या जन्म प्रमाणपत्रावर लिहलं ‘पाकिस्तान’, आई-वडील झाले हैराण!

गुजरातमधील बाळाच्या जन्म प्रमाणपत्रावर लिहलं ‘पाकिस्तान’, आई-वडील झाले हैराण!

ज्या परिसरात बाळाचे आई-वडील राहतात, त्या परिसराचा उल्लेख नागरिक ‘पाकिस्तान क्रॉसिंग’ असं करतात. या ठिकाणी दोन हजारहून अधिक मुस्लीम कुटुंब वास्तव्यास आहेत.

  • Share this:

गांधीनगर, 09 फेब्रुवारी: देशात नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून (CAA) रान उठलं असताना चक्क एका बाळाच्या जन्म प्रमाणपत्रावर (Birth Certificate) ‘पाकिस्तान’चा उल्लेख करण्यात आला आहे. अधिकाऱ्यांच्या या अजब कारभारामुळे बाळाचे आई-वडील हैराण झाले असून त्यांना आता मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. 18 महिन्यांचं हे बाळ असल्याचं सांगितलं जात आहे.

गुजरातच्या गांधीनगरमध्ये ही घटना घडली आहे. एका वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, हे जन्म प्रमाणपत्र अहमदाबाद नगरपालिकेनं दिलं आहे. या जन्म प्रमाणपत्रावर पत्ता लिहताना ‘पाकिस्तान रेल्वे क्रॉसिंग’ असा उल्लेख करण्यात आला आहे. ज्या परिसरात बाळाचे आई-वडील राहतात, त्या परिसराचा उल्लेख नागरिक ‘पाकिस्तान क्रॉसिंग’ असं करतात. या ठिकाणी दोन हजारहून अधिक मुस्लीम कुटुंब वास्तव्यास आहेत. या परिसराला ‘छोटा पाकिस्तान’ असंही म्हटलं जातं. पण, या परिसराचं ‘वसंत गजेंद्रगढ नगर ईडब्ल्यूएस हाऊसिंग’ असं अधिकृत नावं असल्याची माहिती आहे. इतकंच नाही तर, जवळच असलेल्या  सद्भावना नगर आणि कुशाभाऊ कॉलिनीचा उल्लेख नागरिक हिंदुस्तान असं करतात. याठिकाणी हिंदू समुदयाचे नागरिक मोठ्या प्रमाणावर राहतात.

(हेही वाचा :अव्वाच्या सव्वा किंमतीत औषधं विकणाऱ्यांचं खरं नाही, गुन्हा होऊ शकतो दाखल)

काय म्हटलं जन्म प्रमाणपत्रामध्ये?

मोहम्मद उजेर खान या 18 महिन्याच्या बाळाचा जन्म 1 ऑक्टोबर, 2018 रोजी झाला. हे कुटुंब रेल्वे काँसिंगजवळील चार मजली इमारतीमध्ये राहतात. बाळाची आजी, शालेहा बीबी पठान या 3 फेब्रुवारी रोजी सरकारी कार्यालयात बाळाचं जन्म प्रमाणपत्र घेण्यास गेल्या. जेव्हा कुटुंबाने हे जन्म प्रमाणपत्र पाहिलं तेव्हा त्यामध्ये ‘पत्ता’च्या रकान्यात ‘निअर पाकिस्तान रेल्वे क्रॉसिंग’ असं लिहण्यात आलं होतं. हा पत्ता पाहूनच कुटुंब हैराण झाले.

(हेही वाचा: 'या' म्युझिकल अलार्मने तुमची मॉर्निंग होईल गूड, सुस्तीही होईल दूर)

आता पुढे काय?

‘बाळाच्या पालकांना कार्यालयात बोलवून कागदपत्रांची पडताळणी आम्ही केली आहे. ही चूक लवकरच दुरुस्त केली जाईल’, असं आश्वासन जन्म-मृत्यू प्रमाणपत्र विभागाचे अधिकारी भाविन जोशी यांनी दिलं आहे. दरम्यान, आमचं या ठिकाणी कोणीच ऐकत नसून, आम्हाला मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. देशात CAA आणि NRC कायद्याचं वातावरण असून त्या पार्श्वभूमीवर आम्ही आमच्या बाळाचं जन्म प्रमाणपत्र घेण्यास गेलो. परंतु, प्रमाणपत्रावरचा उल्लेख पाहता आम्हाला मोठा धक्का बसला आहे, असं पालक म्हणाले.

First published: February 9, 2020, 6:06 PM IST
Tags: baby

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading