'देव करो, पाकिस्तानसारखा शेजारी कोणालाही न मिळो'

'देव करो, पाकिस्तानसारखा शेजारी कोणालाही न मिळो'

पाकच्या बिथरलेपणावर उत्तर देताना राजनाथ सिंह म्हणाले, 'देव करो पाकिस्तानसारखा शेजारी कोणालीही न मिळो'.

  • Share this:

नवी दिल्ली, 08 ऑगस्ट: जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर बिथरलेल्या पाकिस्तानने भारतासोबतचे सर्व राजकीय संबंध तोडले आहेत. तसेच व्यापार देखील थांबवला आहे. पाकच्या या निर्णयावर सरंक्षण मंत्री राजनाध सिंह यांनी त्यांचा समाचार घेतला. कलम 370 रद्द करण्याच्या भारताच्या निर्णयाला संयुक्त राष्ट्र संघात जाणार असल्याचे पाकने म्हटले आहे. पाकच्या या बिथरलेपणावर उत्तर देताना राजनाथ सिंह म्हणाले, 'देव करो पाकिस्तानसारखा शेजारी कोणालीही न मिळो'.

भारताला सर्वाधिक शंका त्याच्या शेजारच्या देशावरच आहे. आपल्याला मित्र बदलता येतात, पण शेजारी बदलता येत नाही. तसेच शेजारच्या देशातील निवडणुका देखील तुमच्या हातात नसतात. मी देवाकडे प्रार्थना करतो की जसा शेजारी (पाकिस्तान) आम्हाला मिळाला आहे. तसा कोणालाही मिळू नये, असे राजनाथ सिंह म्हणाले.

Samjhauta Express : 'ड्रायव्हरला पाठवून ट्रेन घेऊन जा,' पाकिस्तानचा आडमुठ्ठेपणा

भारतातल्या उच्चायुक्तालयांना परत पाठवल्यानंतर पाकिस्तानने आता समझौता एक्सप्रेस रद्द केली आहे. पाकिस्तानमधून भारतात येणारी ट्रेन आलीच नाही. त्यामुळे समझौता एक्सप्रेसचे प्रवासी अटारी सीमेवर अडकून पडले. भारताने मात्र याबद्दल अजून अधिकृत माहिती दिलेली नाही. पण पाकिस्तानने या ट्रेनचा ड्रायव्हर आणि गार्डला ट्रेन सुरू न करण्याच्या सूचना दिल्या, अशी माहिती आहे.

आणि ट्रेन आलीच नाही

अटारी आंतरराष्ट्रीय रेल्वे स्टेशनचे अधीक्षक अरविंदकुमार गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानमधून समझौता एक्सप्रेस भारतात येणं अपेक्षित होतं. पण भारतीय रेल्वेने आपला ड्रायव्हर आणि कर्मचाऱ्यांना पाठवून समझौता एक्सप्रेस सीमेवरून घेऊन जावी, असा संदेश आला. पाकिस्तानने रेल्वेसुरक्षेच्या कारणासाठी हा निर्णय घेतला असं त्यांचं म्हणणं आहे.आता भारतीय रेल्वेचे ड्रायव्हर आणि ज्यांच्याकडे व्हिसा आहे अशा कर्मचाऱ्यांना समझौता एक्सप्रेस आणण्यासाठी पाठवलं जाणार आहे.

याआधी पाकिस्तानने भारताशी संबंध तोडल्याचं जाहीर केलं होतं. तसंच भारताला युद्धाची धमकीही दिली होती. पाकिस्तानने भारताच्या विमानांना आपल्या हवाई हद्दीत येण्याची परवानगीही नाकारली आहे.

भारतीय चित्रपटांवरही बंदी

पाकिस्तानने भारताशी व्यापारविषयक संबंध तोडल्याचं पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मेहम्मूद कुरेशी यांनी टीव्हीवरून जाहीर केलं. पाकिस्तानमध्ये भारतीय चित्रपट दाखवण्यावरही इम्रान खान यांच्या सरकारने बंदी घातली आहे.

पाकिस्तानने काश्मीरबद्दलच्या निर्णयावर टोकाच्या प्रतिक्रिया देऊ नयेत, अशा सूचना संयुक्त राष्ट्रांनी दिल्या आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री 8 वाजता देशाला उद्देशून भाषण करणार आहेत. काश्मीरमधलं कलम 370 रद्द करणं आणि काश्मीरच्या विभाजनाबद्दल पंतप्रधान या भाषणात भारताची भूमिका मांडतील, अशी अपेक्षा आहे.

आधी बचावकार्य नंतर पॅकेजचं बघू, मुख्यमंत्र्यांची UNCUT पत्रकार परिषद

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: pakistan
First Published: Aug 8, 2019 04:52 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading