मराठी बातम्या /बातम्या /देश /

स्वत: Love Marriage करणारे पप्पू यादव ठरले होते मित्राच्या प्रेमातील व्हिलन, 32 वर्षांपुर्वीच्या अपहरणाची कहाणी

स्वत: Love Marriage करणारे पप्पू यादव ठरले होते मित्राच्या प्रेमातील व्हिलन, 32 वर्षांपुर्वीच्या अपहरणाची कहाणी

 'गरीबांचे मसीहा', 'रॉबिनहुड' म्हणून ओळखले जाणारे बिहारमधील (Bihar) माजी खासदार पप्पू यादव (Pappu Yadav) यांच्या अटकेमुळं सध्या बिहारमध्ये खळबळ माजली आहे. तब्बल 32 वर्षापूर्वी घडलेल्या एका प्रकरणात पोलिसांनी आता त्यांना अटक केली आहे.

'गरीबांचे मसीहा', 'रॉबिनहुड' म्हणून ओळखले जाणारे बिहारमधील (Bihar) माजी खासदार पप्पू यादव (Pappu Yadav) यांच्या अटकेमुळं सध्या बिहारमध्ये खळबळ माजली आहे. तब्बल 32 वर्षापूर्वी घडलेल्या एका प्रकरणात पोलिसांनी आता त्यांना अटक केली आहे.

'गरीबांचे मसीहा', 'रॉबिनहुड' म्हणून ओळखले जाणारे बिहारमधील (Bihar) माजी खासदार पप्पू यादव (Pappu Yadav) यांच्या अटकेमुळं सध्या बिहारमध्ये खळबळ माजली आहे. तब्बल 32 वर्षापूर्वी घडलेल्या एका प्रकरणात पोलिसांनी आता त्यांना अटक केली आहे.

पुढे वाचा ...

मधेपुरा, 13 मे: 'गरीबांचे मसीहा', 'रॉबिनहुड' म्हणून ओळखले जाणारे बिहारमधील (Bihar) माजी खासदार पप्पू यादव (Pappu Yadav) यांच्या अटकेमुळं सध्या बिहारमध्ये खळबळ माजली आहे. तब्बल 32 वर्षापूर्वी घडलेल्या एका प्रकरणात पोलिसांनी आता त्यांना अटक केली आहे. कोरोना साथीच्या (Corona Virus Pandemic) काळात लोकांच्या सेवेमुळे आणि त्यानंतर रुग्णवाहिका (Ambulance Matter) प्रकरणामुळे पप्पू यादवचर्चेत आले होते. त्यांना अचानक पोलिसांनी या जुन्या प्रकरणात अटक करून सुपौल तुरूंगात त्यांची रवानगी केली आहे. मात्र त्यांच्या सुटकेसाठी सोशल मीडियावर (Social Media) जोरदार मोहीम सुरू करण्यात आली असून, काही ठिकाणी लोकं रस्त्यावरही उतरले आहेत.

या सगळ्या प्रकारामुळे पप्पु यादव यांच्याबद्दल अनेक काही जुन्या कथा चर्चिल्या जात आहेत. माजी खासदारअसलेल्या पप्पु यादव यांनी स्वतः रंजित रंजन यांच्याशी प्रेमविवाह केला आहे; पण एकेकाळी ते आपल्याच मित्राच्या प्रेमकहाणीत खलनायक बनले होते. मित्राच्या प्रेमविवाहाला विरोध करत त्यांनी चक्क त्या दोघांचे अपहरण केलं होतं. तेच प्रकरण आज पुन्हा त्यांच्या अटकेचं कारण बनलं आहे, मात्र हा सगळा राजकीय कट असल्याचा आरोप त्यांचे समर्थक, मित्र करत आहेत.

हे वाचा-मध्य प्रदेशातील रांज नदीत मृतदेह तरंगताना आढळले; स्थानिक ग्रामस्थांमध्ये भीतीचं

1989 मधील हे प्रकरण असून, तेव्हा पप्पू यादव पूर्णियामध्ये शिकत होते. मुरलीगंजमध्ये त्याचे अनेक मित्र राहत होते आणि ते नेहमीच इथं येत जात असत. दरम्यान, त्यांच्या एका मित्राचे एका मुलीवर प्रेम जडले, त्याला तिच्याशी लग्न करायचे होते. पण पप्पु यादव यांचा या प्रेमविवाहाला विरोध होता. त्यामुळे त्यांची त्या मित्रासह इतर मित्रांशीही बाचाबाची झाली होती.

मित्राच्या अपहरणाची कहाणी:

या प्रकरणाबाबत ग्वालपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या बिरगाव चत्रा पंचायतचे सध्या सरपंच असलेले आणि या प्रकरणाचे सूचक असणारे शैलेंद्र यादव यांनी न्यूज18 ला माहिती दिली. या प्रेम विवाहावरून एकदा केपी कॉलेजच्या (KP College) मैदानावर पप्पू यादव आणि त्यांचे मित्र यांच्यात वाद झाला. त्यानंतर एक किंवा दोन दिवसांनी आम्ही काही जण मुरलीगंज मधील मध्यवर्ती चौकात पान खात असताना, आम्हाला काही समजायच्या आत पप्पू यादव आपल्या साथीदारांसह आला आणि आमच्यातील दोघांना जबरदस्तीनं आपल्या सोबत घेऊन गेला. आम्हाला सुरुवातीला काही समजलं नाही. आम्ही पोलिसांत तक्रार दिली, त्यानंतर दोनच दिवसात ते दोघे सुखरूप परत आले.

हे वाचा-'तेरा मुझसे है पहले का नाता..' म्हणत मुलानं आईला Video Call वर केलं अलविदा

एक वर्षानंतरच झाले आमदार

काही दिवसांनंतर पप्पू यादव यांना दुसर्‍या एका प्रकरणात अटक करण्यात आली; पण ते जामिनावर बाहेर आले. प्रेमप्रकरण असणाऱ्या त्या मित्राचेही त्याच्या मैत्रिणीशी लग्न झालं आणि परिस्थिती सुरळीत झाली. पप्पू यादव यांनीही राजकारणात प्रवेश केला. एकाच वर्षानंतर 1990 मध्ये ते सिंघेश्वर इथून अपक्ष आमदार म्हणून निवडून आले आणि त्यांची राजकीय कारकीर्द पुढे गेली. या प्रेमविवाहामुळे झालेल्या वादावादीमुळे आम्हा मित्रांचे दोन गट झाले,असं शैलेंद्र यांनी सांगितलं. या प्रकरणी पप्पु यादव यांनी अटक करण्यात आल्याबद्दल बोलताना शैलेंद्र म्हणाले की, ‘हे प्रकरण तेव्हाच संपले होते. आम्ही सर्वांनी दोनदा कोर्टात याचिका दाखल केली होती. या प्रकरणातील अन्य आरोपीही निर्दोष सुटले; परंतु आज अचानक या प्रकरणात पप्पू यादव यांना अटक होणं हे समजण्या पलीकडे आहे. हा निश्चितच राजकीय कट आहे.’

हे वाचा-औषधं वाया घालवली नाही, केरळ सरकारनं रेमडेसिवीरचे 1 लाख डोस केंद्राला केले परत

32 वर्ष जुन्या प्रकरणात अटक आश्चर्यकारक

मुरलीगंज पोलीस ठाण्याच्या अखत्यारीतील या प्रकरणात पप्पू यादव यांना पोलिसांनी तुरूंगात डांबलं आहे. पप्पू यादव आणि त्यांच्या साथीदारांवर रामकुमार यादव आणि उमा यादव यांचं अपहरण केल्याचा आरोप आहे. याच प्रकरणातील एक साक्षीदार कृष्णनारायण यादव यांनी देखील इतक्या वर्षांनी पप्पू यादव यांना अटक करण्यात आल्याबद्दल तीव्र आश्चर्य व्यक्त केलं आहे. 'भाजपा खासदाराचं रुग्णवाहिका प्रकरण उघडकीस आणणं पप्पू यादव यांना महागात पडलं असून, सरकारनं जाणूनबुजून हे जुनं प्रकरण उकरून काढत त्यांना तुरुंगात पाठवलं आहे’, असं त्यांनी म्हटलं आहे.

मित्रांनी केली चिंता व्यक्त

पप्पू यादव यांच्या अटकेबाबत अनेकांनी चिंता व्यक्त केली असून यामध्ये त्यांच्या मित्रपरिवारासह केपी कॉलेजचे प्राध्यापक नागेंद्र यादव यांचाही समावेश आहे. केपी कॉलेजचे विद्यार्थी असलेल्या रामकुमार यादव आणि उमा यादव यांचं अपहरण पप्पु यादव यांनी केलं होतं. त्यावरून सर्वत्र खूपच गदारोळ माजला होता; पण एक-दोन दिवसातच हे दोघंही सुखरूप परत आले होते. त्यामुळं आता 32 वर्षानंतर या प्रकरणात पप्पू यादव यांना अटक करणं अनाकलनीय आहे. कोरोना साथीच्या या काळात लोकांची सेवा करणाऱ्या व्यक्तीला अशी अचानक अटक होणं चिंताजनक आहे, अशी प्रतिक्रिया त्यांच्या मित्रांनी व्यक्त केली आहे.

First published:

Tags: Bihar