मराठी बातम्या /बातम्या /देश /

Punjab Election Results Updates : पंजाबमध्ये मतमोजणीला सुरुवात; काँग्रेसची आघाडी

Punjab Election Results Updates : पंजाबमध्ये मतमोजणीला सुरुवात; काँग्रेसची आघाडी

पंजाबच्या 117 जागांच्या निकालांसाठी मतमोजणी केली जात आहे (Punjab Assembly Elections 2022). सध्या मतमोजणीला सुरुवात झाली असून पंजाबमध्ये काँग्रेस सध्या एका सीटने पुढे आहे.

  • Published by:  Kiran Pharate

चंदीगड 10 मार्च : पंजाबमधील विधानसभेच्या 117 जागांसाठी 20 फेब्रुवारी रोजी मतदान झालं होतं (Punjab Voting Results). मात्र, गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा पंजाबमध्ये कमी मतदान झालं आहे. 20 फेब्रुवारी रोजी राज्यात सुमारे 71.95 टक्के मतदान झालं आहे. आज म्हणजेच 10 मार्च रोजी पंजाबच्या 117 जागांच्या निकालांसाठी मतमोजणी केली जात आहे (Punjab Assembly Elections Result 2022). राज्यात 66 ठिकाणी 117 मतमोजणी केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. या 117 मतमोजणी केंद्रांवर सुरक्षेसाठी त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था करण्यात आली असून त्यासाठी केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या 45 कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. सध्या मतमोजणीला सुरुवात झाली असून पंजाबमध्ये काँग्रेस सध्या एका सीटने पुढे आहे.

एक्झिट पोलनुसार, काँग्रेसला गेल्या निवडणुकीच्या तुलनेत 10 टक्क्यांनी मतदान कमी झालं असून यंदा 19 टक्के मतदान झालं आहे. तर भाजपला 7 टक्के मतदान झालं आहे. अकाली दलाला 19 टक्के मतदान झालं आहे. तर आम आदमी पक्षाला तब्बल 41 टक्के मतदान झाल्याचं सांगण्यात आलं आहे. तर अन्यला 5 टक्के मतदान झालं आहे.

इंडिया टुडेच्या पोल्सनुसार, आम आदमी पक्षाला सर्वाधिक मतदान झालं आहे. पंजाबध्ये 117 विधानसभेसाठी निवडणूक झाल्या असून विजयासाठी 59 जागा आवश्यक आहे. एक्झिट पोलनुसार, काँग्रेस - 19-31 (जागा येण्याची शक्यता), अकाली दल - 7-11, आप - 76-90 जागांवर विजयी होण्याची शक्यता आहे.

पंजाबमध्ये यंदा संघर्ष मोठी इंटरेस्टिंग आहे. यंदा येथे मल्टिअँगल फाइट पाहायला मिळत आहे. एकीकडे सत्तेत असलेली काँग्रेस आहे तर दुसरीकडे आम आदमी पार्टी, अकाली-बीएसपी आघाडी सरकार, भाजप आणि अमरिंदर सिंग यांचं अलाइन्स. त्याशिवाय शेतकरी संघटनेनेही यंदाच या पक्षांनी टक्कर दिली आहे. अशात पंजाबमध्ये कोणाचं सरकार येणार, याचा अंदाज बांधणं कठीण झालं होतं.

First published:

Tags: AAP, Assembly Election, BJP, Punjab, काँग्रेस