मराठी बातम्या /बातम्या /देश /पाणीपुरी, वडापाव आणि बरचं काही; स्ट्रीट फूडच्या चमचमीत पदार्थांचा आस्वाद घ्या घरच्या घरी

पाणीपुरी, वडापाव आणि बरचं काही; स्ट्रीट फूडच्या चमचमीत पदार्थांचा आस्वाद घ्या घरच्या घरी

आता प्रत्येक वेळेस आवडीचे पदार्थ हॉटेलमधून मागवण्याची गरज नाही.

आता प्रत्येक वेळेस आवडीचे पदार्थ हॉटेलमधून मागवण्याची गरज नाही.

आता प्रत्येक वेळेस आवडीचे पदार्थ हॉटेलमधून मागवण्याची गरज नाही.

नवी दिल्ली, 5 जानेवारी : केंद्र सरकारने रस्त्याच्या शेजारील खाण्या-पिण्याचे पदार्थ विकणाऱ्यांसाठी ऑनलाइन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून मार्केट उपलब्ध करण्यासाठी एक पाऊल उचललं आहे. आवास आणि शहरी कार्य मंत्रालयाने पीएम स्वनिधी योजना (PM SVANIDHI Scheme) अंतर्गत स्ट्रीट फूड वेंडर्सला ऑनलाइन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून उपलब्ध करुन देण्यासाठी झोमॅटो सोबत हात मिळवणी केली आहे.

फूड एग्रीगेटर झोमॅटोने गुरुवारी योजनेवर काम करण्यासाठी सरकारसोबत करार केला आहे. सुरुवातील 6 शहरांमध्ये 300 फूट वेडर्संना झोमॅटोसोबत ट्रेनिंग देण्यात येईल. ज्यामध्ये भोपाळ, रायपूर, पाटना, वडोदरा, नागपूर आणि लुधियाना यांचा समावेश आहे. पहिल्या टप्प्यात यशस्वी झाल्यानंतर झोमॅटो ही योजना 125 शहरांपर्यंत घेऊन जाईल आणि 125 शहरांमध्ये स्ट्रीट वेंडर्ससोबत काम करतील. पीएम स्वनिधी योजना मिशन डायरेक्टर आणि झोमॅटो ऑफिशियल यांनी करार केला आहे. ज्याअंतर्गत झोमॅटो, स्ट्रीट फूड वेडर्सच्या पॅन कार्ड बनविण्यासाठी एफएसएसएआय (FSSAI) रेजिस्ट्रेशन, फूड मेन्यूला डिजिटाइज करणं, वेंडरला सेफ्टी/हायजिनसाठी ट्रेनिंग देणं आणि फूड प्राइस नक्की करण्यासाठी स्वत: काम करतील.

हे ही वाचा-मालकाने मांजरीला दिली 'खुन्नस', आपोआप आली वळणावर, VIDEO पाहून पोट धरून हसाल!

Swiggy सोबत सरकारने केला करार

ऑक्टोबर 2020 मध्ये सरकारने फूड एग्रीगेटर Swiggy सोबत या योजनेअंतर्गत असाच करार केला होता.

स्ट्रीट वेडर्संना मिळतील ग्राहक

कोरोना महासाथीदरम्यान स्ट्रीट फूड वेंडर्सच्या विक्रीत घट झाली आहे. अशात झोमॅटो आणि स्विगीच्या माध्यमातून ऑनलाइन मार्केट मिळाल्याने स्ट्रीट फूड वेडर्संना बरीच मदत मिळेल. यामाध्यमातून जेथे स्ट्रीट वेडर्सना नवी ग्राहक मिळेल तर दुसरीकडे लोकांनाही घरबसल्या आपल्या आवडत्या स्ट्रीट फूडचा आनंद घेता येणार आहे.

First published:

Tags: Zomato