प्रश्न विचारल्याने भडकले राधे माँचे भक्त, पत्रकाराला केली मारहाण

प्रश्न विचारल्याने भडकले राधे माँचे भक्त, पत्रकाराला केली मारहाण

अखिल भारतीय आखाडा परिषदेनं दोन वर्षांपूर्वी बोगस बाबांची यादीच जाहीर केली होती. या यादीत राधे माँचा समावेश होता.

  • Share this:

पानिपत 29 जुलै : कायम वादग्रस्त असणाऱ्या राधे माँ उर्फ सुखविंदर कौर पुन्हा एकदा वादात सापडल्या आहेत. कावड यात्रेसाठी त्या येथे आल्या होत्या. त्यावेळी एका स्थिनिक चॅनलच्या पत्रकाराने त्यांना प्रश्न विचारला. या प्रश्नाने स्वत:संत म्हणविणाऱ्या राधे माँचा संयम सुटला आणि त्या भडकल्या. त्यामुळे त्यांच्यां भक्तांनीही धुडगूस घालायला सुरुवात केली. शेवटी पोलीस आल्याने त्यांनी प्रकरण शांत केलं आणि राधे माँ आणि त्यांच्या भक्तांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

कावड यात्रेदरम्यान राधे माँ या पानिपत मधल्या शिबीरात आल्या होत्या. त्यावेळी एका पत्रकाराने प्रश्न विचारल्याने त्यांचा पारा चढला. भक्तांनी पत्रकाराला घेरून मारहाण केली. शेवटी पोलिसांनी हस्तक्षेप करत पत्रकाराची सुखरूप सुटका केली आणि त्याला घरी पोहोचवलं नंतर गुन्हा दाखल करत भक्तांना ताकीद दिली आणि प्रकरण शांत झालं.

गडचिरोलीत C-60 कमांडोंची धाडसी कारवाई, महिला माओवादी ठार तर पाच जखमी

बोगस बाबांच्या यादीत राधे माँ

स्वयंघोषित बाबांनी समाजातलं वातावरण दूषित करून टाकलंय. त्यामुळे अखिल भारतीय आखाडा परिषदेनं दोन वर्षांपूर्वी बोगस बाबांची यादीच जाहीर केली होती. या यादीत राधे माँचा समावेश होता.

राम रहिम, राधे माँ, आसाराम यांच्यामुळे देशातल्या अध्यात्मिक गुरूंची प्रतिमा मलिन होऊ लागली होती. त्यामुळेच अखिल भारतीय आखाडा परिषदेनं देशातल्या भोंदूबाबांची यादीच जाहीर करण्याचा निर्णय घेतला होता.

धक्कादायक : महिलांच्या 'फर्स्ट क्लास'च्या डब्यात तरुणाचं हस्तमैथुन

या यादीत गुरमीत राम रहीम, आसाराम बापू, राधे माँ, सचिदानंद गिरी, ओम बाबा, इच्छाधारी भीमानंद, स्वामी असिमानंद, खुशी मुनी, बृहस्पती गिरी आणि मलकान गिरी अशा भोंदू बाबांचा समावेश होता.

आखाडा परिषदेनं अध्यात्मिक गुरूंसाठी आचारसंहिताही जाहीर केली होती. तरी गेल्या काही वर्षांमध्ये अशा बाबांचे अनेक कारनामे समोर आलेत. या राधे माँचा मुंबईतल्या बोरीवलीत अलीशान आश्रम आहे.

Tags: radhe maa
First Published: Jul 29, 2019 09:58 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading