मराठी बातम्या /बातम्या /देश /

Pandora Papers : सचिन तेंडुलकरसह अनेक सेलिब्रेटींच्या काळ्या पैशांचा गौप्यस्फोट?

Pandora Papers : सचिन तेंडुलकरसह अनेक सेलिब्रेटींच्या काळ्या पैशांचा गौप्यस्फोट?

महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरसह (Sachin Tendulkar) 300 भारतीयांच्या काळ्या पैशांचा गौप्यस्फोट केल्याचा दावा ICIJ या संस्थेनं पँडोरा पेपर्सच्या (Pandora Papers) माध्यमातून केला आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 4 ऑक्टोबर :  पाच वर्षांपूर्वी  पनामा पेपर (Panama Paper) लीक प्रकरणानं संपूर्ण जगभर खळबळ उडाली होती. या पेपर्समध्ये जगातील अनेक बड्या व्यक्तींच्या बनावट कंपन्या आणि टॅक्स चोरीचं सत्य उघडकीस आलं होतं. आता पुन्हा एकदा ICIJ या संस्थनेनं नवा गौप्यस्फोट केला आहे. पँडोरा पेपर्स (Pandora Papers) असं या प्रकरणाचं नाव असून यामध्ये महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याचं देखील नाव आहे.

जगभरातील 1.19 कोटी कागदपत्रांची छाननी करुन हे काळ्या पैशांचं रहस्य जगासमोर आणल्याचा दावा ICIJ या संस्थेनं केला आहे. एकूण 117 देशांमधील 600 पत्रकारांनी या तपासात भाग घेतला आहे. भारतामध्ये 'इंडियन एक्सप्रेस' या वृत्तपत्रात हा अहवाल सविस्तरपणे छापण्यात आला आहे.

भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याचाही सहभाग असल्याचा दावा संस्थेनं केला आहे. पनामा पेपर लीक नंतर अनेक भारतीयांनी आपल्या संपत्तीची नव्यानं रचना करण्यास सुरुवात केली होती. त्यामध्ये सचिनचाही समावेश आहे. सचिननं हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर तीन महिन्यांमध्येच ब्रिटीश वर्जिन आयलँडमधील संपत्ती विकण्याचा प्रयत्न सुरू केला अशी माहिती यामध्ये देण्यात आली आहे. मात्र सचिनच्या वकिलानं एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना हे सर्व  आरोप फेटाळले आहेत. सचिनची सर्व गुंतवणूक कायदेशीर असल्याचा दावा त्याच्या वकिलानं केला आहे.

या रिपोर्टमध्ये 300 पेक्षा जास्त भारतीयांचे नावं आहेत. त्यांच्यासंबंधीचे पुरावे गोळा केले असून आगामी काळात याबाबत गौप्यस्फोट केला जाईल, अशी माहिती या संस्थेनं दिली आहे.

First published:

Tags: Sachin tendulkar