मोदीजी, तुम्ही माझ्या वडिलांच्या पाया पडायचात, बहिणीला न्याय द्या' पं. छन्नूलाल मिश्रांच्या मुलीची आर्त हाक, VIDEO

मोदीजी, तुम्ही माझ्या वडिलांच्या पाया पडायचात, बहिणीला न्याय द्या' पं. छन्नूलाल मिश्रांच्या मुलीची आर्त हाक, VIDEO

ज्येष्ठ गायक पद्मविभूषण पंडित छन्नूलाल मिश्रा (Pandit Chhannulal Mishra) यांची पत्नी मनोरम आणि मोठी मुलगी संगीता या दोघींचा कोरोनामुळे (Covid19) वाराणसीत मृत्यू झाला आहे.

  • Share this:

वाराणसी, 4 मे: हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतातल्या किराना घराण्याचे ज्येष्ठ गायक पद्मविभूषण पंडित छन्नूलाल मिश्रा (Pandit Chhannulal Mishra) यांची पत्नी मनोरम आणि मोठी मुलगी संगीता या दोघींचा कोरोनामुळे (Covid19)वाराणसीत मृत्यू झाला आहे. पं. छन्नूलाल यांची धाकटी मुलगी नम्रता मिश्रा (Namrata Mishra)यांनी हॉस्पिटल प्रशासनावर आपल्या बहिणीच्या हत्येचा आरोप केला आहे. बहिणीवर काय उपचार झाले, याची काहीच माहिती इथल्या प्रशासनाने डॉक्टरांनी दिले नाहीत. त्यांनी बहिणीशी बोलू दिलं नाही, CCTV फुटेज दिलं नाही. हा मृत्यू नाही खून आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच आता माझ्या बहिणीला न्याय द्यावा, अशी हात जोडून विनंती करणाऱ्या नम्रता मिश्रा यांचा VIDEO VIRAL झाला आहे.

या संदर्भात नम्रता यांनी पोलिसांकडे तक्रार केली आहे. वाराणसीचे जिल्हा दंडाधिकारी कौशल राजशर्मा यांनी या प्रकरणाचा तपास करण्यासाठी तीन डॉक्टरांचा समावेश असलेली समिती नेमली आहे. या प्रकरणाचा तपास करून सत्य स्थितीचा शोध घेतला जाणार आहे. दरम्यान, नम्रता शर्मा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशूनहात जोडून रडत रडत आपल्या बहिणीला न्याय देण्याची मागणी केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. 'जनसत्ता'ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे.

"मोदीजी, तुम्ही माझ्या वडिलांच्या पाया पडता. त्यांना मानता. तुमच्यावर आमचा विश्वास आहे. माझ्या बहिणीला न्याय मिळवून द्या," अशी हात जोडून रडत रडत विनंती करताना नम्रता या व्हिडीओमध्ये दिसत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी (Varanasi)मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्या वेळी पं. छन्नूलाल मिश्रा त्यांचे प्रस्तावक होते.

पं. मिश्रा यांची 76 वर्षांची पत्नी मनोरमा यांना रवींद्रपुरी येथील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यांचं 27 एप्रिलला निधन झालं. तसंच, मुलगी संगीता यांना मेडविन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. संगीता यांना भेटण्याची/ पाहण्याची मागणी कुटुंबीयांनी केल्यानंतर हॉस्पिटल प्रशासनाने टाळाटाळ सुरू केली. कधी स्क्रीन खराब झाल्याचं कारण देण्यात आलं, तर कधी त्यांना वॉर्डमध्ये जाण्याची परवानगी नाकारण्यात आली.

'कोरोनामध्ये पैशांचा काहीच उपयोग नाही'; ब्रीजवरुन पैशांचा पाऊस, VIDEO VIRAL

नम्रता मिश्रा यांनी सांगितलं,की 26 एप्रिल रोजी आई मनोरमा यांचं निधन झालं. त्यानंतर त्यांच्या वडिलांनी आपली मुलगी संगीता हिला पाहण्यासाठी डॉक्टर्सच्या मिनतवाऱ्या केल्या; मात्र त्यांना आजारी मुलीचा फोटोही दाखवण्यात आला नाही. एक मे रोजी संगीता यांचं हॉस्पिटलमध्ये निधन झालं, असं नम्रता यांना कळवण्यात आलं. आई आणि बहिणीच्या निधनामुळे कोसळून गेलेल्या नम्रता यांनी सोमवारी (3 मे) हॉस्पिटल प्रशासनाकडे जाऊन सीसीटीव्ही फुटेज(CCTV Footage)दाखवण्याची मागणी केली; मात्र त्यांच्या मागणीला हॉस्पिटल प्रशासनाने काहीच उत्तर दिलं नाही. तिथे बराच काळ गोंधळ झाला.

आरोग्यमंत्र्यांनी राज्याला दिली दिलासादायक बातमी

तिथल्या गोंधळामुळे पोलिसही तिथे दाखल झाले. नम्रता यांनी हॉस्पिटलच्या डॉक्टर्सवर आपल्या बहिणीच्या हत्येचा आरोप केला आणि पोलिसांकडे लेखी तक्रार दिली. पोलिसांनी सांगितलं,की तक्रार मिळाली असून,तपास सुरू आहे. त्यात ठोसपुरावे सापडल्यानंतर गुन्हा दाखल केला जाईल.

दरम्यान, वाराणसीचे जिल्हा दंडाधिकारी कौशल राज शर्मा यांनी या प्रकरणाच्या तपासासाठी तीन डॉक्टरांची समिती नेमली आहे. ही समिती तपास करून सत्याचा धांडोळा घेणार आहे.

दरम्यान, नम्रता मिश्रा यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. 'प्रधानमंत्रीजी, तुम्ही माझ्या वडिलांच्या पाया पडता ना! तुमच्याकडून माझीएक अपेक्षा आहे. माझ्या ताईला न्याय मिळवून द्या,' अशा शब्दांत नम्रता मिश्रा यांनी हात जोडून रडत रडत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साकडं घातल्याचं या व्हिडिओत दिसत आहे. या व्हिडिओवर अनेकांनी कठोर शब्दांत मोदी यांच्यावर टीका केली आहे.

'पंतप्रधानांकडून काहीही होणार नाही. त्यांना बाकीच्यांच्या दुःखाचं काही नाही. त्यांनी लवकरात लवकर राजीनामा दिला पाहिजे,' अशा आशयाच्या अनेक प्रतिक्रिया लोकांनी या व्हिडिओवर व्यक्त केल्या आहेत.

First published: May 4, 2021, 7:41 PM IST

ताज्या बातम्या