VIDEO : खेळणी, गाणी, धम्माल, मस्ती, पांडांच्या पिल्लांची बर्थ डे पार्टी!

ही एक अशी बर्थ डे पार्टी आहे की ज्याचं आमंत्रण आपल्यालाही यावं असं तुम्हाला वाटेल. या पार्टीत केलेली ही टेडीबेअरची सजावट नाही तर ही पार्टी या पांडाच्या पिल्लांसाठी सजली आहे. या पार्टीत पांडाच्या 18 पिल्लांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

News18 Lokmat | Updated On: Jul 30, 2019 06:24 PM IST

VIDEO : खेळणी, गाणी, धम्माल, मस्ती, पांडांच्या पिल्लांची बर्थ डे पार्टी!

मुंबई, 30 जुलै : ही एक अशी बर्थ डे पार्टी आहे की ज्याचं आमंत्रण आपल्यालाही यावं असं तुम्हाला वाटेल. या पार्टीत केलेली ही टेडीबेअरची सजावट नाही तर ही पार्टी या पांडाच्या पिल्लांसाठी सजली आहे.

या पार्टीत पांडाच्या 18 पिल्लांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यामध्ये काय नव्हतं ? म्युझिक, फ्रुट केक आणि धम्माल होती. हॅपी बर्थ डे च्या ट्यूनवर सगळे नाचतही होते.

चीनमधल्या जायंट पांडा कॉन्झर्व्हेशन अँड रिसर्च सेंटरमध्ये ही पार्टी रंगली होती. इथे पांडांचं प्रजनन यशस्वी झालं आहे आणि गेल्या वर्षी 31 जायंट पांडांनी जन्म घेतला आहे. यामध्ये जुळ्या पिल्लांचाही समावेश आहे. पांडाच्या या नर आणि मादी पिल्लांना आता नर्सरीमध्ये दाखल करण्यात आलं आहे.

बांबूची कार!

एका प्रचंड बर्थ डे केकसोबतच या पांडाच्या पिल्लांना खेळणी भेट देण्यात आली आणि गाणीही ऐकवण्यात आली. यामुळे खुश होऊन ही पिल्लंही झाडावर चढून मस्ती करत होती. एका बांबूच्या कारमध्ये बसून त्यांनी धमाल केली.

या पांडा क्लबच्या फॅन्सना बर्थ डे पार्टीचं आमंत्रण देण्यात आलं होतं. या फॅन्सनीही आपल्या आवडत्या पिल्लांची ही मौज बघितली आणि त्यांना हॅपी बर्थ डे केलं. याआधी कुणीही पांडाच्या एवढ्या पिल्लांना एकत्र पाहिलं नव्हतं. त्यामुळे पांडांवर प्रेम करणारे सगळेच जण खूश होते. पांडांची ही पिल्लं आता बांबूचे कोंब खाऊ शकतात. याआधी ते पूर्णपणे आईच्या दुधावरच अवलंबून होते.

कर्नाटकात वाघीणीचं नाव 'हिमा', गोल्डन कामगिरीचा असाही गौरव!

चीनमधल्या या पांडा प्रजनन केंद्रात आतापर्यंत सध्या 285 पांडा आहेत. जगभरामध्ये पांडा दुर्मिळ झाल्यामुळे आता त्यांचं प्रजनन करून पांडांची संख्या वाढवण्याचा हा प्रयत्न आहे.

जंगलामध्ये राहणाऱ्या पांडांची संख्या फक्त 2 हजारवर आली आहे. त्यातही चीनमध्ये सिचुआन आणि शांक्सी प्रांतात पांडांचा आढळ आहे.

==================================================================================

कोसळणारा पाऊस आणि पूर, अशा परिस्थितीत 6 महिन्याच्या तान्हुल्याला तरुणाने वाचवलं, VIDEO व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 30, 2019 06:24 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...