S M L

आॅन ड्युटी फुल टाईट, तर्राट महिला डाॅक्टरचा रुग्णालयात धिंगाणा

. रुग्णांच्या नातेवाईकांनी या महिला डाॅक्टरबद्दल आक्षेप घेतला तेव्हा या महिला डाॅक्टरने त्यांच्याशीच हुज्जत घातली.

Sachin Salve | Updated On: May 3, 2018 07:06 PM IST

आॅन ड्युटी फुल टाईट, तर्राट महिला डाॅक्टरचा रुग्णालयात धिंगाणा

रायपूर, 02 मे : एका सामाजिक आरोग्य केंद्रात आॅन ड्युटी फुल टाईट अवस्थेत एका महिला डाॅक्टरने धिंगाणा घातला. या महिला डाॅक्टने इतकी दारू प्यायली होती की ती काय बोलते याची शुद्ध सुद्धा तिला नव्हती. तरी अशा अवस्थेतच ती रुग्णांना तपास करत होती.

रायपूर राणी येथील सामाजिक आरोग्य केंद्रात बुधवारी रात्री या सगळा प्रकार घडला. रात्री ड्युटीवर हजर असलेल्या या महिला डाॅक्टरने आरोग्य केंद्रात धिंगाणा घातला. रुग्णांच्या नातेवाईकांनी या महिला डाॅक्टरबद्दल आक्षेप घेतला तेव्हा या महिला डाॅक्टरने त्यांच्याशीच हुज्जत घातली.  अखेर स्थानिक पत्रकारांनी घटनास्थळी पोहोचून दारूड्या महिला डाॅक्टरचा प्रताप कॅमेऱ्यात कैद केला. पत्रकार जेव्हा व्हिडिओ रेकाॅर्ड करत होते तर "तुम्ही मुर्ख आहात, मी तुमच्या प्रश्नाची उत्तर देणार नाही" अशी हुज्जतही घातली. पोलीस पोहोचण्याच्या आधीच  ही महिला डाॅक्टर आपली कार घेऊन पळून गेली.

या प्रकाराची तातडीने दखल घेत वरिष्ठ अधिकारी संजीव गोयल यांनी या महिला डाॅक्टरच्या ऐवजी नवी डाॅक्टरला  रुग्णालयात पाठवलं. या प्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले असून कारवाई करण्यात येणार असल्याचं आश्वासन दिलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 3, 2018 06:56 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close