4 महिन्यांपूर्वी झाला होता शहीद मेजर अनुज सूद यांचा विवाह, पत्नीशी व्हॉट्सअ‍ॅपवर झालं अखेरचं बोलणं

4 महिन्यांपूर्वी झाला होता शहीद मेजर अनुज सूद यांचा विवाह, पत्नीशी व्हॉट्सअ‍ॅपवर झालं अखेरचं बोलणं

जम्मू काश्मीरच्या हंदवाडा परिसरात जवान आणि दहशतवादी यांच्यात झालेल्या चकमकीत मेजर अनुज सूद यांच्यासह 4 जवान शहीद झाले.

  • Share this:

श्रीनगर, 04 मे : जम्मू काश्मीरच्या हंदवाडा परिसरात रविवारी (3 मे) रोजी भारतीय सैन्यदल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. यात मेजर, कर्नल, पोलीस अधिकाऱ्यासह तीन जवान शहीद झाले आहेत. शहीद झालेल्या जवानांमध्ये 21 राष्ट्रीय राइफल्स यूनिटचे कमांडिंग ऑफिसर कर्नल आशुतोष शर्मा, मेजर अनुज सूद, दिनेश शर्मा, जम्मू-काश्मीरचे पोलीस निरीक्षक शकील काझी यांचा समावेश आहे. या चकमकीत शहीद झालेले मेजर अनुज सूद याच्या शहीद झाल्याची बातमी कुटुंबाला कळताच, त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला.

हंदवाडा परिसरात काही दहशतवादी लपल्याची माहिती शनिवारी मिळाली होती. त्यानंतर सर्च ऑपरेशन करत असताना दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. या भ्याड हल्ल्याला भारतीय सैन्यानं चोख प्रत्युत्तर दिलं आहे. मात्र त्याच वेळी 4 जणांना शहीद व्हावं लागलं. शहीद मेजर अनुज सूद यांचे चार महिन्यांपूर्वीच लग्न झालं होतं. त्यांचे वडील निवृत्त ब्रिगेडियर चंद्रकांत सूद यांनी सांगितले की, "मेजरनं सर्वोच्च बलिदान दिलं आहे. त्यानं आपलं कर्तव्य योग्य बजावलं आहे. मला त्याच्या पत्नीबद्दल वाईट वाटत आहे, कारण 3-4 महिन्यांपूर्वीच त्यांचा विवाह झाला होता.

वाचा-शहीद कर्नलच्या फोनवरून अतिरेकी म्हणाला, सलाम वालेकुम; JK एन्काऊंटरचा थरार

व्हॉट्सअ‍ॅपवर झाले होते शेवटचे संभाषण

ब्रिगेडिअर (सेवानिवृत्त) सीके सूद यांनी सांगितले की, "मला देशाच्या या मुलाचा अभिमान आहे. संपूर्ण देशाला त्याचा अभिमान आहे. तो तीन दिवस म्हणजे 1 मेपासून ऑपरेशनवर होता. आमचे शेवटचे संभाषण व्हॉट्सअ‍ॅपवर झाले होते. तीन दिवसांपूर्वी फोनवर बोललो होतो. तो नेहमीच धाडसी होता आणि दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सर्वात पुढे होता. त्याच्याबरोबर शहीद झालेले सर्व जवान खूप शूर होते. अशा शूर सैनिकांना भारतरत्न नाही पण किमान त्यांना अशोक चक्र मिळायला हवे. जेव्हा आपण कोरोन योद्धांविषयी बोलत आहोत, तेव्हा असे खरे योद्धा आपल्या छातीत बुलेट घेत आहेत". हंदवाडा इथल्या चांजमुल्ला परिसरात दहशतवाद्यांनी काही नागरिकांना घरात बंदी बनवलं होतं. एका घरात त्यांना ठेवल्याची माहिती गुप्तचर विभागाकडून सुरक्षा दलाला मिळाली होती. या नागरिकांची सुखरुप सुटका करण्यासाठी टीम रवाना झाली. याच दरम्यान त्यांच्यात चकमक झाली.

वाचा-नागरिकांची सुटका करण्यासाठी दहशतवाद्यांशी लढताना 5 जवान झाले शहीद

वाचा-कोरोना योध्यांना सलाम! मुलची मृत्यूशी झुंज, पोलीस जवान मात्र कर्तव्यावर हजर

संरक्षणमंत्र्यांनी शोक व्यक्त केला

रविवारी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी हंदवाडा येथे दहशतवादविरोधी चकमकी दरम्यान शहीद झालेल्या पाच सैनिकांच्या मृत्यूवर दु: ख व्यक्त केले आणि त्याला 'अत्यंत त्रासदायक व वेदनादायक' म्हटले. सिंह म्हणाले की, सैनिकांनी दहशतवाद्यांविरूद्धच्या लढाईत धैर्याचे उदाहरण उभे केले आणि त्यांचे शौर्य व संघर्ष कायम लक्षात ठेवले जातील.

First published: May 4, 2020, 9:08 AM IST
Tags:

ताज्या बातम्या