पाकिस्तान सरकारने आवळल्या हाफिज सईदच्या मुसक्या

पाकिस्तान सरकारने आवळल्या हाफिज सईदच्या मुसक्या

सामाजिक संघटना असल्याचं सांगून हाफिज सईद दहशतवादासाठी पैसा गोळा करत असल्याचा त्याच्यावर आरोप आहे.

  • Share this:

इस्लामाबाद 7 मार्च  : पाकिस्तानात बंदी असलेल्या जमात उल दवा या संघटनेच्या मुसक्या आवळायला स्थानिक पंजाब सरकारने सुरुवात केलीय. सरकारने जमात आणि त्यांची दुसरी संघटना फलाह ए इन्सानियत या संघटनेच्या मुख्यालयावर ताबा मिळवला आहे. तर त्यांच्याशी संबधित मदरसे आणि मशिदींवरही त्यांनी ताबा मिळवला आहे.

हाफिज सईद हा लष्करे ए तोयबाचा संस्थापक आहे. या दहशतवादी संघटनांवर बंदी घातल्यानंतर त्याने जमात उल दवा आणि फलाह ए इन्सानियत  या दोन संघटना तयार केल्या होत्या. या सामाजिक संघटना असल्याचं सांगून तो दहशतवादासाठी पैसा गोळा करत असल्याचा त्याच्यावर आरोप आहे.

संयुक्त राष्ट्राचा दणका

लष्कर ए तोयबाचा संस्थापक हाफिज सईद याला संयुक्त राष्ट्राने दणका दिला आहे. हाफीजचं त्याचं नाव अतिरेक्यांच्या यादीतून वगळण्यास संयुक्त राष्ट्राने नकार दिला आहे. या यादीतून नाव काढून टाकावं अशी मागणी करणारा अर्ज हाफिज सईदने केला होता.

बंदी असलेल्या जगभरातल्या दहशतवाद्यांची आणि संघटनांची यादी संयुक्त राष्ट्राने केली आहे. दरवर्षी ती यादी अपडेट होत असते. त्या यादीत नाव आल्यावर जगभर त्या संस्थांवर आणि व्यक्तिंवर आर्थिक निर्बंध येतात. त्यांच्या सर्व व्यवहारावरही बंदी येते. अशा व्यक्ती आणि संस्थांसोबत व्यवहार करण्यासही कुणी पुढे येत नाही त्यामुळे या यादीतून त्यांचं नाव वगळावं  अशी मागणी हाफिज सईदने केली होती.

तोयबावर बंदी घातल्यानंतर त्याने जमात उल दवा ही संघटना स्थापन केली होती. ही सामाजिक संस्था आहे असं सांगत त्यान त्या आडून दहशतवादी कारवाया केल्याचं उघड झालं होतं.

SPECIAL REPORT : भुजबळांनी पाणीपुरी तर मुख्यमंत्र्यांनी मारला पकोड्यांवर ताव

First published: March 7, 2019, 8:53 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading