नवी दिल्ली, 9 जून : पाकिस्तानकडून होणारा घुसखोरीचा मोठा प्रयत्न भारतीय लष्कराने हाणून पाडला आहे. लष्कराने जवळपास तीन दहशतवाद्याचा खात्मा केला असून अनेक दहशतवादी जखमी अवस्थेत पळून गेले आहेत. त्यामुळे कुरापती करणाऱ्या पाकिस्तानला भारताने पुन्हा एकदा दणका दिला आहे.
मेंढर सेक्टरमधील सीमा ओलांडून भारतात घुसखोरीचा एक मोठा प्रयत्न भारतीय लष्कराला हाणून पाडला.आधीच या भागावर लक्ष ठेवून असलेल्या भारतीय लष्कराच्या जवानांनी या घुसखोरांना आव्हान दिले आणि दोन्ही बाजूंकडून झालेल्या गोळीबारात तीन घुसखोर दहशतवादी ठार झाले. उर्वरित दहशतवाद्यांना परत पळवून लावण्यास भाग पाडले गेले ज्यामध्ये 2 ते 3 जखमीही झाले.
सोमवारीही केली होती मोठी कारवाई
जम्मू-काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यात सोमवारी पहाटे लष्कराच्या आणि सीएपीएफ तुकड्यांसह सुरू झालेल्या पोलीस कारवाईत चारही दहशतवादी ठार झाले. ते हिजबुल मुजाहिद्दीन संबंधित आहेत. सुरक्षा दलानं संपूर्ण परिसर बंद करण्यात करून सर्च ऑपरेशन सुरू केलं होतं. या कारवाईसह आतापर्यंत हिजबुल मुजहिद्दीनच्या 9 दहशतवाद्यांना ठार करण्यात भारतीय लष्कराला यश आलं आहे. शोपियान जिल्ह्यातील पिंजुरा गावात दहशतवादी आणि सुरक्षा दलांच्या दरम्यान एनकाऊंटर सुरू झाले होते.
6 महिन्यांमध्ये 100पेक्षा जास्त दहशतवाद्यांचा खात्मा
जम्मू आणि काश्मीरमध्ये सुरक्षा दलाला यावर्षात मोठं यश मिळालं आहे. जानेवारी ते 9 जून या सहा महिन्यांमध्ये सुरक्षा दलांनी तब्बल 104 दहशतवाद्यांचा खात्मा केला. यानंतर सुरक्षा दलांनी आणखी 125 दहशतवाद्यांची हिट लिस्ट तयार केली असून त्यात त्यात 25 विदेशी दहशतवाद्यांचा समावेश आहे अशी माहिती लष्कराच्या 15व्या कोअर कमांडचे नेतृत्व करणारे लेफ्टनंट जनरल बी.एस.राजू यांनी दिली. तर दहशतवाद्यांशी लढताना 29 जवान आणि अधिकारी शहीद झाले अशी माहितीही त्यांनी दिली.