मराठी बातम्या /बातम्या /देश /

26/11च्या दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानचा हात, नवाज शरीफ यांची कबुली

26/11च्या दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानचा हात, नवाज शरीफ यांची कबुली

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी पहिल्यांदाच मुंबई हल्ल्यात पाकिस्तानी अतिरेक्यांचा हात असल्याची कबूल दिली आहे. 'द डॉन' या पाकिस्तानी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत नवाज शरीफ यांनी हे खळबळजनक वक्तव्य केलं आहे.

मुंबई, 12 मे : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी पहिल्यांदाच मुंबई हल्ल्यात पाकिस्तानी अतिरेक्यांचा हात असल्याची कबुल दिली आहे. 'द डॉन' या पाकिस्तानी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत नवाज शरीफ यांनी हे खळबळजनक वक्तव्य केलं आहे.

यावेळी नवाज शरीफ यांनी दहशतवादी संघटनांवरही भाष्य केलं. काही 'दहशतवादी संघटना सक्रीय आहेत. त्यांना सीमा ओलांडायची आणि मुंबईत जाऊन 150 लोकांची हत्या करण्याची परवानगी द्यायला हवी का?,' असं शरीफ यांनी म्हटलं आहे.

'रावळपिंडीच्या दहशतवादविरोधी न्यायालयात आम्ही मुंबई हल्ल्याची सुनावणी का पूर्ण केली नाही ?,' असा सवालदेखील त्यांनी उपस्थित केला. याआधी पाकिस्ताननं नेहमीच 2008 मधील मुंबई हल्ल्यात आपला कोणताही हात नसल्याचा दावा केला आहे. पण नवाज शरीफ यांच्या या वक्तव्यामुळे पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा पुन्हा एकदा समोर आला आहे.

पुढे ते म्हणाले की, 'एका देशात एकच सरकार चालू शकतं. पाकिस्तानात मात्र अनेक समांतर सरकारं आहेत. त्यामुळे देश चालवायचा तरी कसा' असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

First published:

Tags: 26/11 हल्ला, Mumbai attack, Nawaz sharif, Pakistan, Terrorism, दहशतवाद, पाकिस्तान