कुलभूषण जाधव यांनी दहशतवाद पसरवल्याचा पाकिस्तानचा आरोप

हेरगिरीचे खोटे आरोप ठेवून, कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानच्या लष्करी न्यायालायाकडून फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर आता त्यांच्यावर दहशतवाद आणि घातपाताचा आरोप ठेवण्यात आला आहे.

Renuka Dhaybar | News18 Lokmat | Updated On: Feb 7, 2018 08:41 AM IST

कुलभूषण जाधव यांनी दहशतवाद पसरवल्याचा पाकिस्तानचा आरोप

07  फेब्रुवारी : हेरगिरीचे खोटे आरोप ठेवून, कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानच्या लष्करी न्यायालायाकडून फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर आता त्यांच्यावर दहशतवाद आणि घातपाताचा आरोप ठेवण्यात आला आहे. जाधव यांना पाकिस्तानच्या या खटल्यांना तोंड द्यावं लागत आहे. जाधव यांच्यावर ठेवेलेले हे आरोप खोटे आहेत, अशी भारताची भूमिका आहे. तसेच त्यांची शिक्षा रद्द व्हावी, यासाठी भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयातही धाव घेतली आहे.

जाधव यांना गेल्या वर्षी एप्रिलमध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यांना ३ मार्च, २०१६ रोजी बलुचिस्तान प्रांतात सुरक्षा दलांनी अटक केल्याचा दावा पाकिस्ताननं केला आहे. जाधव हे इराणमधून पाकिस्तानात आल्याचं पाकिस्तानचं म्हणणं आहे. पण हा आरोप भारतानं नाकारला आहे.

गेल्या वर्षी मे महिन्यात भारतानं लष्करी न्यायालयाच्या निर्णयाला आंतरराष्ट्रीय न्यायालयात (आयसीजे) आव्हान दिलं होतं. त्यानुसार आयसीजेत याचिकेवर अंतिम सुनावणी व्हायची आहे. 'डॉन' या पाकिस्तानी वृत्तपत्राने अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, जाधव यांच्यावर अनेक खटले असून त्यातील दहशतवाद आणि घातपाताशी संबंधित आरोपांच्या प्रकरणांची सुनावणी सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 7, 2018 08:30 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...