फिरोजपूरमधून पाकिस्तानी हेराला अटक

फिरोजपूरमधून पाकिस्तानी हेराला अटक

पाकिस्तानच्या हेराला बीएसएफनं फिरोजपूरमधून अटक केली आहे. त्याची सध्या चौकशी सुरू आहे.

  • Share this:

फिरोजपूर,1 मार्च : भारताविरोधात कुरापती करण्याची एकही संधी पाकिस्तान सोडत नाही. भारत - पाकिस्तानमधील तणाव अद्याप शांत झालेला नाही. तोच भारतानं पाकिस्तानच्या हेराला अटक केली आहे. पंजाबमधील फिरोजपूरमधून त्याला अटक करण्यात आली. भारत - पाकिस्तान सीमारेषेचे फोटो घेताना त्याला बीएसएफनं अटक केली. यावेळी त्यांची चौकशी करून झडती घेतल्यानंतर त्याच्याकडून पाकिस्तानी सीम कार्ड देखील जप्त करण्यात आले. अटक केलेला हेर उत्तर प्रदेशातील मुरादाबादमधील रहिवासी आहे. सध्या त्याची कसून चौकशी सुरू आहे.
पुलवामा हल्ल्यानंतर भारत - पाकमध्ये सध्या तणावाचं वातावरण आहे. त्याचवेळी भारतानं पाकिस्तानच्या हेराला अटक केली आहे. दरम्यान, भारतानं केलेल्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्ताननं भारतावर हवाई हल्ल्याचा केलेला प्रयत्न भारतानं हाणून पाडला. शिवाय, पत्रकार परिषद घेत पाकिस्तानविरोधात पुरावे देखील सादर केले.


पाकचा खोटारडेपणा पुन्हा उघड, दहशतवादी मसूद अजहर पाकिस्तानातच!


अभिनंदन आज परतणार भारतात

मिग - 21 विमान दुर्घटनाग्रस्त झाल्यानंतर पाकिस्तानच्या ताब्यात असलेले विंग कमांडर अभिनंदन भारतात परतणार आहेत. भारताच्या दबावापुढे अखेर पाकिस्ताननं नTVमतं घेत अभिनंदन यांच्या सुटकेची 32 तासांच्या आत घोषणा केली. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्नान खान यांनी गुरूवारी संसदेमध्ये तशी घोषणा केली होती.

अभिनंदन भारतात येणार असल्यानं देशवासियांमध्ये सध्या आनंदाचं वातावरण आहे. वाघा बॉर्डरवर देखील लोक हजारोंच्या संख्येनं जमले आहेत. पाकिस्ताननं ताब्यात घेतल्यानंतर देखील अभिनंदन यांनी अत्यंत हुशारीनं पाकिस्तानच्या प्रश्नांना उत्तरं दिली. त्यांचे यु ट्यूबवर अपलोड केलेले 11 व्हिडीओ देखील आता हटवण्यात आले आहेत.

दरम्यान, सध्या साऱ्या देशवासियांचं लक्ष आता विंग कमांडर अभिनंदन यांच्या भारतात परत येण्याच्या वाटेकडे लागून राहिलं आहे.

VIDEO : शहीद निनाद अमर रहे... उरात अभिमान आणि डोळ्यात पाणी


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 1, 2019 11:07 AM IST

ताज्या बातम्या