पाकिस्तानी गायिकेने सुसाइड जॅकेट घालून मोदींना दिली धमकी

पाकिस्तानी गायिकेने सुसाइड जॅकेट घालून मोदींना दिली धमकी

पाकिस्तानी गायिका रबी पिरजादा ही तिच्या सोशल मीडियावरच्या वादग्रस्त पोस्ट्समुळे चांगलीच चर्चेत असते. तिने सुसाइड जॅकेट घालून तिचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला. या फोटोसोबत तिने पंतप्रधान नरेंद्र मोदींना धमकीही दिली.

  • Share this:

इस्लामाबाद, 23 ऑक्टोबर : पाकिस्तानी गायिका रबी पिरजादा ही तिच्या सोशल मीडियावरच्या वादग्रस्त पोस्ट्समुळे चांगलीच चर्चेत असते. आता ती तिच्या ड्रेसमुळे ट्रोल होतेय. तिने एक सुसाइड जॅकेट घालून तिचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला. या फोटोसोबत तिने पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं.

या जॅकेटवर टाइमर बॉम्बसारखी स्फोटकं असावीत, असं तिच्या छायाचित्रात दिसतं आहे. त्याखाली ती लिहिते, #ModiHitler i just wish huh #kashimirkibeti

तिच्या या फोटोवर भारतातल्या नेटिझन्सनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. हा पाकिस्तानचा राष्ट्रीय वेष आहे का? असा प्रश्न एकाने विचारला आहे. ज्या देशात दहशतवाद्यांच्या कारवायांना खतपाणी घातलं जातं त्या देशाचा वेष असाच असणार, असंही नेटिझन्सनी म्हटलं आहे.

याआधी याच रबी पिरजादाने सापांसोबत एक व्हिडिओ पोस्ट केला होता. त्यात तिने सापांच्या हल्ल्याची धमकी दिली होती.

(हेही वाचा : दिवाळीच्या आधी सोन्याला झळाळी, चांदीलाही आली चमक, हे आहेत आजचे दर)

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी हा वेष राष्ट्रीय वेष म्हणून जाहीर करावा, अशीही प्रतिक्रिया काही जणांनी सोशल मीडियावर दिली आहे.

गेल्या महिन्यात याच पंजाब वन्यजीव संरक्षण विभागाने रबी पिरजादा हिच्यावर अजगर, सुसर आणि साप पाळल्याबद्दल कारवाई केली होती. लाहोर कोर्टाने तिच्याविरुद्ध अटक वॉरंटही काढलं होतं.

=======================================================================================

VIDEO: पुढचे 3-4 दिवस पावसाचे, पुण्यासह राज्यासाठी हवामान खात्याने वर्तवला 'हा' अंदाज

First published: October 23, 2019, 4:37 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading