पाहा VIDEO : या गायिकेने मोदींना दिली Snake Attack ची धमकी

भारताने काश्मीरमधलं 370 कलम रद्द केल्यानंतर पाकिस्तानने टोकाच्या प्रतिक्रिया दिल्या. आता एक पाकिस्तानी गायिका राबी पीरजादा हिनेही पंतप्रधान नरेंद्र मोदींना सापांच्या हल्ल्याची धमकी दिली आहे.

News18 Lokmat | Updated On: Sep 4, 2019 05:38 PM IST

पाहा VIDEO : या गायिकेने मोदींना दिली Snake Attack ची धमकी

नवी दिल्ली, 4 सप्टेंबर : भारताने काश्मीरमधलं 370 कलम रद्द केल्यानंतर पाकिस्तानने टोकाच्या प्रतिक्रिया दिल्या. आता एक पाकिस्तानी गायिका राबी पीरजादा हिनेही पंतप्रधान नरेंद्र मोदींना हल्ल्याची धमकी दिली आहे.

ही धमकी कुठल्या बॉम्बस्फोटाची नाही की आत्मघातकी हल्ल्याचीही नाही. तिने सापांच्या हल्ल्याची धमकी दिली आहे. तिने ट्विटरवर हे साप आणि मगरींसह एक व्हिडिओ अपलोड केला आहे.

या व्हिडिओमध्ये ती म्हणते, एक काश्मिरी मुलगी आपल्या सापांसह तयार आहे. तिने काश्मीरच्या मुद्द्यावर आवाज उठवण्यासाठी एक गाणंही म्हटलं आहे. याआधीही तिने भारतीय सैन्य आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात अपशब्द वापरले होते.

काश्मीर हे पाकिस्तानचं आहे, असंही गायिका राबी पीरजादा हिने म्हटलं आहे. भारताने जम्मू आणि काश्मीरमध्ये कलम 370 रद्द केल्यानंतर पाकिस्तानने हा मुद्दा संयुक्त राष्ट्रसंघात नेला. पण यावरून पाकिस्तानच तोंडघशी पडला. पण तरीही पाकिस्तानी नागरिक काश्मीरबद्दल तीव्र प्रतिक्रिया देत आहेत.

PHOTO : मुसळधार पावसामुळे मुंबईची तुंबई, पाहा हे 10 फोटो

======================================================================================================

पाळणा चोरण्याच्या नादात बाळाला मॉलमध्येच विसरून आली महिला, CCTV व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 4, 2019 05:38 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...