BREAKING : जिवंत आहे मसूद अझहर; पाक मंत्र्याचा दावा

BREAKING : जिवंत आहे मसूद अझहर; पाक मंत्र्याचा दावा

पाकिस्तानचे माहिती आणि सांस्कृतिक मंत्री फैयाज उल हसन यांनी मसूद अझहर जिवंत असल्याची माहिती दिली आहे. जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसू अझहरचा मृत्यू झाल्याची कोणतीही वार्ता आमच्याकडे नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 4 मार्च : पाकिस्तानचे माहिती आणि सांस्कृतिक मंत्री फैयाज उल हसन यांनी मसूद अझहर जिवंत असल्याची माहिती दिली आहे. जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसू अझहरचा मृत्यू झाल्याची कोणतीही वार्ता आमच्याकडे नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

'जैश-ए-मोहम्मद'चा म्होरक्या मसूद अझहरचा 2 मार्चला पाकिस्तानात मृत्यू झाल्याची बातमी सूत्रांनी दिली होती. तर तो जिवंत असल्याचे वृत्त पाकिस्तानी माध्यमांनी दिलं होतं. पाकिस्तानी लष्कराने रविवारी(3मार्च) संध्याकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास मसूद अझहरला रावळपिंडीतील रुग्णालयातून बहावलपूरमधील गोथ गन्नी येथील 'जैश-ए-मोहम्मद'च्या तळावर हलवले, असे वृत्त 'टाइम्स ऑफ इंडिया'ने दिले आहे. मसूद अझहरला किडनीचा आजार झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून त्याच्यावर पाकिस्तानच्या लष्करी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. दरम्यान, पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री मेहमूद कुरेशी यांनी सीएनएनसोबत बातचित करताना जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहर पाकिस्तानातच असल्याची कबुली दिली होती. मसूद अझहर आजारी असून त्याला घराबाहेर पडणं शक्य होत नसल्याची माहिती कुरेशींनी दिली होती.

दुसरीकडे, पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर कुरापती पाकिस्तानवर जागतिक स्तरावर प्रचंड दबाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर, 'जैश-ए-मोहम्मद'सहीत बंदी घालण्यात आलेल्या सर्व दहशतवादी संघटनांसंदर्भातील आपल्या भूमिकेवरुन पाकिस्तान संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत चक्क यू-टर्न घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत (UNSC)दहशतवाद्यांच्या यादीमध्ये 'जैश-ए-मोहम्मद'चा म्होरक्या मसूद अझहरला नावाचा समावेश करण्याच्या प्रस्तावास पाकिस्तान समर्थन दर्शवण्याची शक्यता आहे. पाकिस्तानातील वृत्तपत्र 'एक्स्प्रेस ट्रिब्यून'मध्ये यासंदर्भातील वृत्त देण्यात आले आहे.

(ही बातमी अपडेट होत आहे.)

VIDEO : AIRSTRIKE मध्ये राफेल असतं तर चित्र वेगळं असतं - नरेंद्र मोदी

First published: March 4, 2019, 5:42 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading