Article 370 : मोदी आणि अमित शहांबदद्ल पाकिस्तानी मीडियाचं काय म्हणणं आहे?

Article 370 : मोदी आणि अमित शहांबदद्ल पाकिस्तानी मीडियाचं काय म्हणणं आहे?

काश्मीरमधून कलम 370 हटवण्याच्या निर्णयावर पाकिस्तानी मीडियाने अपेक्षेप्रमाणेच तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. 'डॉन' या वृत्तपत्राच्या आणखी एका लेखात भारत सरकारला 'हिंदू राष्ट्रवादी' म्हटलं आहे.

  • Share this:

मुंबई, 5 ऑगस्ट : काश्मीरमधून कलम 370 हटवण्याच्या निर्णयावर पाकिस्तानी मीडियाने अपेक्षेप्रमाणेच तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. पाकिस्तानच्या 'डॉन' या वृत्तसमूहाच्या वेबसाइटने काश्मीरमधलं कलम 370 हटवण्याच्या निर्णयाबद्दल सविस्तर लिहिलं आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत हा प्रस्ताव मांडल्यानंतर मोठा गदारोळ झाला, असं नमूद करत 'डॉन' ने या निर्णयावरची काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांची प्रतिक्रिया दिली आहे. भाजपने भारताच्या राज्यघटनेची हत्या केली, असं गुलाम नबी आझाद यांनी म्हटलं होतं. काश्मीरमध्ये संवाद आणि दळणवळणाच्या सेवा बंद केल्याबद्दल आणि संचारबंदी लागू केल्याबद्दलही 'डॉन' ने लिहिलं आहे.

पाकिस्तानच्या 'जिओ' टीव्हीने पाकिस्तानमधले विरोधीपक्ष नेते शहाबाज शरीफ यांच्या वक्तव्याचा हवाला देऊन लिहिलं आहे, भारत सरकारचा हा निर्णय संयुक्त राष्ट्राच्या विरोधात केलेला द्रोह आहे.

'मोदींच्या युद्धनीतीचा पुरावा'

पाकिस्तानमधल्या 'द नेशन' ने भारताच्या या निर्णयावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. भारत सरकारने एक पूर्ण वंशच नष्ट करण्याचा मार्ग अवलंबला आहे, असं 'द नेशन' ने लिहिलं आहे. भारताचा हा निर्णय मोदींच्या युद्धनीतीचा पुरावा आहे, असंही यात म्हटलं आहे. पाकिस्तानची नकारात्मक प्रतिमा बनवण्यासाठी भारत मोठा प्रपोगंडा करेल त्याचबरोबर पर्यटक आणि प्रसारमाध्यमांना जाणीवपूर्वक बाजूला ठेवून भारत सरकार काश्मीरला जगापासून तोडत आहे, असं 'द नेशन' चं म्हणणं आहे.

Article 370 : अमित शहांनी एकाच दगडात असे मारले अनेक पक्षी

भारताला एक वंशच संपवायचा आहे आणि नियंत्रण रेषेवर तणाव निर्माण करून पाकिस्तानला झुंजवत ठेवायचं आहे. पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानने जे पाऊल उचललं त्याची प्रशंसा झाली. म्हणूनच मोदी सरकारला पाकिस्तानच्या विरुद्ध अजेंडा राबवायचा आहे, असंही या वृत्तसमूहाने म्हटलं आहे.

'हा हिंदू राष्ट्रवाद'

'डॉन' या वृत्तपत्राच्या आणखी एका लेखात भारत सरकारला 'हिंदू राष्ट्रवादी' म्हटलं आहे. काश्मीरमधल्या लोकसंख्येचं समीकरण बदलण्यासाठी सरकारने हे केलं आहे. काश्मीरमधल्या मुस्लिमांऐवजी इथे हिंदू लोकसंख्या जास्त असावी, असा सरकारचा डाव आहे, असंही या लेखात म्हटलं आहे. 'द न्यूज'मध्ये म्हटलं आहे, भारत सरकारने सुरक्षेच्या नावाखाली काश्मीरला कुलूपबंद केलं. मेहबुबा मुफ्ती, ओमर अब्दुल्ला यांना नजरकैदेत ठेवल्याची बातमीही 'द न्यूज'ने प्रामुख्याने छापली.

=========================================================================================

कलम 370 हटवल्यानंतर काय होणार? पाहा हा VIDEO

Published by: Arti Kulkarni
First published: August 5, 2019, 6:38 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading