IAF चं विमान क्रॅश, टेक्निकल टीम घटनास्थळी दाखल

IAF चं विमान क्रॅश, टेक्निकल टीम घटनास्थळी दाखल

आतापर्यंत या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.

  • Share this:

श्रीनगर, 27 फेब्रुवारी : भारतीय हवाई दलाचं विमान जम्मू-काश्मीरमधील बडगाम इथं कोसळलं आहे. त्यानंतर आता हवाई दलाची टेक्नीकल टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. 'आतापर्यंत या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे,' असं बडगामच्या वरिष्ठ पोलीस अधीक्षकांकडून सांगण्यात येत आहे.

या दुर्घटनेत दोन वैमानिकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, भारताच्या हवाई हल्ल्यानंतरही पाकच्या कुरापती सुरूच आहेत. जम्मू-काश्मीरमधील शोपियानमध्ये पाककडून गोळीबार करण्यात आला. त्याला भारतानेही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. यावेळी भारताने पाकच्या 5 चौक्या उद्ध्वस्त केल्या तसंच पाकिस्तानचे काही सैनिकही मारले गेल्याची माहिती आहे.

भारताने दहशतवाद्यांच्या तळावर हवाई हल्ला केल्यानंतर मंगळवारी संध्याकाळपासून पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात येत आहे. त्यानंतर भारतानेही चांगलंच प्रत्युत्तर दिलं आहे. त्यामुळे सध्या जम्मू-काश्मीरमधील वातावरण अजूनही धुमसत असल्याचं चित्र आहे.

दरम्यान, पुलवामा इथं दहशतवाद्यांनी सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर केलेल्या हल्लाचा भारताने हवाई हल्ला करून बदला घेतला आहे. भारतीय हवाई दलानं पाक व्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांच्या तळांना लक्ष्य केलं आहे. यावेळी भारतीय हवाई दलानं दहशतवादी तळावर 1000 किलोचा बॉम्ब फेकला आहे.

त्यामुळे दहशतवाद्यांचं मोठं नुकसान झालं आहे. भारताच्या या कारवाईत 300 दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याची माहिती आहे. मिराज विमानांनी पाक व्याप्त काश्मीरमध्ये घुसून ही कारवाई केली आहे.

VIDEO : हाऊज द जोश, वाघा बाॅर्डरवर पाकसैनिकांसमोर भारतीयांचा तुफान जल्लोष

First published: February 27, 2019, 11:53 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading