पाकिस्तानचं विमान भारताच्या हद्दीत, हवाई दलानं परतवून लावलं

पाकिस्ताननं काही आगळीक करण्याआधीच भारतीय हवाई दलानं या विमानाला परतवून लावलं आहे.

News18 Lokmat | Updated On: Feb 27, 2019 11:56 AM IST

पाकिस्तानचं विमान भारताच्या हद्दीत, हवाई दलानं परतवून लावलं

श्रीनगर, 27 फेब्रुवारी : पाकिस्तानचं विमान काही वेळापूर्वी भारताच्या हद्दीत आलं होतं. पण पाकिस्ताननं काही आगळीक करण्याआधीच भारतीय हवाई दलानं या विमानाला परतवून लावलं आहे. याबाबत पीटीआयने माहिती दिली आहे.

भारतीय हवाई दलानं पाकव्याप्त काश्मीरात जाऊन दहशतवादी तळावर हल्ला केला. त्यानंतर भारताला प्रत्युत्तर देण्याची धमकी पाकिस्तानने दिली होती. यानंतर आता पाकिस्तानचं विमान भारताच्या हद्दीत आलं होतं.

दरम्यान, भारताच्या हवाई हल्ल्यानंतरही पाकच्या कुरापती सुरूच आहेत. जम्मू-काश्मीरमधील शोपियानमध्ये पाककडून गोळीबार करण्यात आला. त्याला भारतानेही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. यावेळी भारताने पाकच्या 5 चौक्या उद्ध्वस्त केल्या तसंच पाकिस्तानचे काही सैनिकही मारले गेल्याची माहिती आहे.

भारताने दहशतवाद्यांच्या तळावर हवाई हल्ला केल्यानंतर मंगळवारी संध्याकाळपासून पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात येत आहे. त्यानंतर भारतानेही चांगलंच प्रत्युत्तर दिलं आहे. त्यामुळे सध्या जम्मू-काश्मीरमधील वातावरण अजूनही धुमसत असल्याचं चित्र आहे.

दरम्यान, पुलवामा इथं दहशतवाद्यांनी सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर केलेल्या हल्लाचा भारताने हवाई हल्ला करून बदला घेतला आहे. भारतीय हवाई दलानं पाक व्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांच्या तळांना लक्ष्य केलं आहे. यावेळी भारतीय हवाई दलानं दहशतवादी तळावर 1000 किलोचा बॉम्ब फेकला आहे.

Loading...

त्यामुळे दहशतवाद्यांचं मोठं नुकसान झालं आहे. भारताच्या या कारवाईत 300 दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याची माहिती आहे. मिराज विमानांनी पाक व्याप्त काश्मीरमध्ये घुसून ही कारवाई केली आहे.


VIDEO : हाऊज द जोश, वाघा बाॅर्डरवर पाकसैनिकांसमोर भारतीयांचा तुफान जल्लोष

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 27, 2019 11:30 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...