विंग कमांडर अभिनंदन यांचा छळ करणाऱ्या पाकिस्तानच्या जवानाचा खात्मा!

विंग कमांडर अभिनंदन यांचा छळ करणाऱ्या पाकिस्तानच्या जवानाचा खात्मा!

भारतीय हवाई दलातील विंग कमांडर अभिनंदन यांना अटक केल्यानंतर मारहाण करणाऱ्या पाकिस्तानच्या जवानाला भारतीय सुरक्षा दलाने ठार मारले.

  • Share this:

नवी दिल्ली, 20 ऑगस्ट: भारतीय हवाई दलातील विंग कमांडर अभिनंदन यांना अटक केल्यानंतर मारहाण करणाऱ्या पाकिस्तानच्या जवानाला भारतीय सुरक्षा दलाने ठार मारले. गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानकडून शस्त्रसंधी कराराचे उल्लंघन केले जात आहे. पाकिस्तानकडून होणाऱ्या या गोळीबाराला भारताकडून सडेतोड उत्तर दिले जात आहे. भारताने प्रत्युत्तरा दाखल गेलेल्या गोळीबारात अभिनंदनला अटक करून नंतर चौकशी दरम्यान मारहाण करणाऱ्या पाकिस्तानच्या जवानाचा मृत्यू झाला.

पाकिस्तान लष्कराच्या स्पेशल सर्व्हिस ग्रुपमध्ये असलेल्या सुबेदार अहमद खान हा भारतीय जवानांनी केलेल्या गोळीबारात ठार झाल्याचे माहिती सूत्रांनी दिली आहे. सुबेदार अहमद खान यानेच अभिनंदन यांना ताब्यात घेतले होते आणि नंतर चौकशी दरम्यान त्यांना मारहाण देखील केली होती. फेब्रुवारी महिन्यात पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या बालाकोट येथे दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर एअर स्ट्राईक केला होता. त्यानंतर पाकिस्तानच्या हवाई दलाने भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा त्यांना माघारी पाठवताना अभिनंदन यांचे विमान पाक व्याप्त काश्मीरमध्ये कोसळले होते. पाकिस्तानच्या जवानांनी अभिनंदन यांना ताब्यात घेतले होते.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबाराला भारताने दिलेल्या उत्तरा दरम्यान POKमधील नकियाल सेक्टरमध्ये 17 ऑगस्ट रोजी सुबेदार अहमद खान ठार झाला. खान हा भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होता. तेव्हा भारतीय जवानांनी केलेल्या गोळीबारात तो ठार झाला.

27 फेब्रुवारी रोजी जेव्हा पाकिस्तानने अभिनंदन यांना पकडले होते तेव्हा प्रसिद्ध केलेल्या फोटोत खान देखील दिसतो. पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने बालाकोट येथे एअर स्ट्राईक केला होता. भारताच्या एअर स्ट्राईकच्या दुसऱ्याच दिवशी पाकिस्तानच्या मिग 21 विमानांनी भारताच्या हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता. पाकच्या विमानांचा पाठलाग करताना अभिनंदन यांचे विमान POKमध्ये कोसळले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अहमद खान हा नौशेरा, सुंदरबनी आणि पल्लन वाला सेक्टरमधून दहशतवाद्यांना घुसखोरी करण्यास मदत करत असे. जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांना काश्मीरमध्ये पाठवून दहशतवादी कारवाया करणे यासाठी खान आणि त्याचे साधीदार प्रयत्न करत असत.

SPECIAL REPORT : भुजबळांचं शिवसेनेत घरवापसीचं 'हे' आहे मोठं कारण?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 20, 2019 09:11 PM IST

ताज्या बातम्या