‘यामुळे पायलटला हातही लावू शकत नाही पाकिस्तानी सेना’

‘यामुळे पायलटला हातही लावू शकत नाही पाकिस्तानी सेना’

पाकिस्तानी सेनेने प्रसारमाध्यमांसमोर दावा केला आहे की, भारताचा एक पायलट त्यांच्या ताब्यात आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, २७ फेब्रुवारी २०१९-  पाकिस्तानी सेनेने प्रसारमाध्यमांसमोर दावा केला आहे की, भारताचा एक पायलट त्यांच्या ताब्यात आहे. भारताचा पायलट पाकिस्तानच्या ताब्यात असल्याचं पाकिस्तानी सरकारकडून भारत सरकारला अजूनपर्यंत कोणतंही अधिकृत पत्र आलेलं नाही. तसेच जिनेवा युद्ध बंदी अॅक्टनुसार पाकिस्तानकडे जर आपला पायलट असेल तर त्याला सोडावंच लागेल, असं रिटायर्ड मेजर जनरल केके सिन्हा यांनी सांगितलं.

न्यूज१८ हिंदीशी बोलताना मेजर जनरल केके सिन्हा म्हणाले की, 'कारगिल युद्धाच्यावेळी फ्लाइट लेफ्टनंट नचिकेताचं पाकिस्तानात उतरणं... पाक सेनेद्वारे त्याला पकडणं आणि नंतर त्याला सुखरूप सोडणं' हे देशासाठी सर्वात मोठं उदाहरण आहे.

भारतीय पायलटला काहीही झालं तरी जिनेवा अॅक्टचं उल्लंघन करण्यासारखं असेल आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर हा एक गुन्हा आहे. अवघ्या ७ दिवसांमध्ये पाकिस्तानने नचिकेताला सुखरूप भारताकडे सोपवलं होतं. असं जर पाकिस्तानने केलं नाही तर जिनेवा अॅक्टचं उल्लंघन केल्यासारखं होईल. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, त्या पायलटला त्या सर्व वैद्यकीय सुविधा मिळतात ज्या आपल्या देशात सेवेत असताना त्याला मिळतात.

दरम्यान, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी एक व्हिडीयो संदेश देत भारतापुढे चर्चेचा प्रस्ताव मांडला. युद्धाने कुठल्याही देशाचं भलं झालं नाही. युद्धाचा शेवट हा विनाशच असतो असं सांगत त्यांनी पाकिस्तानने आज सकाळी केलेल्या हल्ल्याच्या प्रयत्नाचं समर्थन केलं.

इम्रान खान यांचा हा व्हिडीयो एडिट करून लावण्यात आला होता. पाकिस्तानला कुठल्या नागरी किंवा लष्करी तळावर हल्ला करायचा नव्हता तर फक्त आपली शक्ती दाखवायची होती असंही ते म्हणाले. भारताचे दोन पायलट आमच्या ताब्यात आहेत असा दावा इम्रान खान यांनी केला. पुलवामा हल्ल्यानंतर आम्ही पुरावे देण्याची मागणी केली होती. मात्र भारताने पुरावे दिले नाही, उलट पाकिस्तानच्या हद्दीत येवून हल्ले केले.

परिस्थिती अशीच चिघळत राहिली तर माझ्या आणि नरेंद्र मोदी यांच्या हातातही काही राहणार नाही असंही त्यांनी सांगितलं. आम्ही सर्व विषयावर चर्चा करण्यास तयार आहोत असं सांगत त्यांनी भारतापुढे चर्चेचा प्रस्ताव ठेवला.

भारतीय हवाई दलाचं विमान कोसळलं, घटनास्थळावरील EXCLUSIVE VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 27, 2019 05:55 PM IST

ताज्या बातम्या