Home /News /national /

आश्चर्य...! पाकिस्तानी अधिकाऱ्यांना धक्का; Zoom बैठकीत लागलं 'जय श्री राम'चं गाणं, पाहा VIDEO

आश्चर्य...! पाकिस्तानी अधिकाऱ्यांना धक्का; Zoom बैठकीत लागलं 'जय श्री राम'चं गाणं, पाहा VIDEO

नंतर त्या कार्यक्रमाचा Video सोशल मीडियावर व्हायरल झाला. काश्मीरवर खोटा प्रचार करणाऱ्यांची चांगलीच जिरली अशी प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्यक्त होत होती.

    नवी दिल्ली 29 ऑक्टोबर: पाकिस्तानात कोरोनाचं संकट (Pakistan Corona crisis) आणि सरकारविरुद्ध प्रचंड असंतोष आहे. मात्र तिथले अधिकारी काश्मीरचा (Jammu and Kashmir) विषय काही सोडत नाहीत. अशाच एका Onlineबैठकीत पाकिस्तानी अधिकाऱ्यांना जबर धक्का बसला. बैठकीत अचानक श्री रामाची गाणी लागल्याने सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. नेमकं काय झालं ते कुणालाच कळत नव्हतं. नंतर ती भारतीय हॅकर्सची करामत असल्याची माहिती पुढे आली. पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी काश्मीरवर एका आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचं आयोजन केलं होतं. ZOOMवर हा परिसंवाद सुरू होता. त्यावेळी एक एक वक्ता आपलं मत व्यक्त करत होता. त्याच वेळी अचानक हनुमान आणि रामाचं गाणं वाजायला लागलं. मध्ये हा गाण्याचा आवाज आल्याने नेमकं काय झालं हे कुणालाच कळत नव्हतं. डॉ. वलीद मलिक हे परिसंवादाचं संचलन करत होते. त्यामुळे अन्य वक्तत्यांना वाटं की मलिक यांच्याकडेच गाणं सुरू झालं असावं. त्यामुळे सगळ्यांनी त्यांना आवाज म्युट करण्यास सांगितला. कार्यक्रम हॅक झाला असावा असा अंदाज सगळ्यांनाच आला.त्यानंतर भारतीय हॅकरचा आवाजा आला की  We are Indians, We will Kick You. त्यानंतरही भारतीय हॅकर्सचा आवाज येत होता. आम्ही भारतीय आहोत, 'रोते रहो. या प्रकारामुळे त्या परिसंवादात सहभागी झालेली सगळेच गोंधळून गेले. नेमके काय करावे हे कुणालाच कळत नव्हते. शेवटी सगळ्यांनी अर्धवट कार्यक्रम गुंडाळला. नंतर त्या कार्यक्रमाचा Video सोशल मीडियावर व्हायरल झाला. काश्मीरवर खोटा प्रचार करणाऱ्यांची चांगलीच जिरली अशी प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्यक्त होत होती. पाकिस्तान जगभर काश्मीर आणि भारताविरुद्ध अपप्रचाराची मोहिम राबवत असतो. त्याचाच एक भाग म्हणून हा वेबिनार आयोजित करण्यात आला होता. भारताने काश्मीरमधलं 370वं कलम हटविल्यानंतर तर पाकिस्तानची ही मोहिम जास्तच वाढली आहे. मात्र या अपप्रचारला फारसे बुद्धिजिवी लोक बळी पडत नाहीत. मात्र एका विशिष्ट वर्तुळातून आणि काही माध्यमातून पैशाच्या जोरावर याची चर्चा होत असते. अशा लोकांना भारतीय हॅकर्सनी चांगलाच धडा शिकवला आहे.
    Published by:Ajay Kautikwar
    First published:

    Tags: Jammu and kashmir, Pakistan

    पुढील बातम्या