पाकिस्तानचा रडीचा डाव; 'FATAच्या सहअध्यक्ष पदावरून भारताला हटवा'

पाकिस्तानचा रडीचा डाव; 'FATAच्या सहअध्यक्ष पदावरून भारताला हटवा'

भारताविरोधात पाकिस्ताननं रडीचा डाव खेळायला सुरूवात केली आहे.

  • Share this:

इस्लामाबाद, 10 मार्च : आंतरराष्ट्रीय पातळीवर एकटा पडलेल्या पाकिस्ताननं आता भारताविरोधात रडीचा डाव खेळायला सुरूवात केली आहे. भारताला FATAच्या सहअध्यक्ष पदावरून हटवा अशी मागणी आता पाकिस्ताननं FATAचे अध्यक्ष मार्शल बिलिंगसलीआ यांच्याकडे केली आहे. FATA ही संस्था दहशतवादाला होणाऱ्या अर्थ पुरवठ्यावर नियंत्रण ठेवते. भारताऐवजी दुसऱ्या कोणत्याही देशाची FATAच्या सह अध्यक्षपदी निवडा अशी मागणी पाकिस्ताननं पत्राद्वारे केली आहे. भारताला पदावरून हटवल्यामुळे संस्थेचा कारभार हा निष्पक्ष आणि पारदर्शी असेल पाकिस्तानचं म्हणणं आहे.

पाकिस्ताविरोधात भारताचं शत्रुत्व जगजाहीर आहे. भारतानं पाकिस्तानच्या हद्दीत घुसून एअर स्ट्राईक केला हीच एक गोष्ट भारताला पाकिस्तानबद्दल काय वाटतं हे सांगायला पुरेशी आहे. असं देखील पाकिस्ताननं पत्रात म्हटलं आहे. भारतानं कठोर पावलं उचलताच पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय स्तरावर कोंडी झाली. त्यामुळे पाकिस्तान आता रडीचा डाव खेळताना दिसत आहे.


लोकसभेसह या 4 राज्यांतील विधानसभा निवडणुकांचीही आज होणार घोषणा?


FATAचा पाकिस्तानवर दबाव

अल कायदा, जमात उल दावा, फलाह ए इन्सानियत फाऊंडेशन, लष्कर ए तोयबा, जैश ए मोहम्मद, हक्कानी नेटवर्क आणि तालिबान या दहशतवादी संघटनांवरून FATAनं यापूर्वीच पाकिस्तानवर दबाव टाकला आहे. पण, पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर हा दबाव आणखी वाढला. त्याकरता भारतानं देखील लक्ष घातलं. दरम्यान, पाकिस्ताननं दहशतवादी संघटनांवर कोणताही कारवाई न केल्यास ऑक्टोबर महिन्यामध्ये होणाऱ्या FATAच्या बैठकीमध्ये पाकिस्तानला ब्लॅक लिस्टमध्ये टाकलं जाऊ शकतं. त्यामुळं पाकिस्तानच्या अडचणी आणखी वाढू शकतात. त्याचा परिणाम हा पाकिस्तानच्या अर्थ व्यवस्थेवर होऊ शकतो.

24 मार्च रोजी FATAचं शिष्टमंडळ पाकिस्तान भेटीवर येणार आहे. त्यावेळी साऱ्या गोष्टींची समीक्षा केली जाईल. त्यामुळे FATAच्या पाकिस्तान दौऱ्याकडे आता लक्ष लागून राहिलं आहे.


VIDEO: 'देशाच्या सुरक्षेमध्ये CISFची भूमिका महत्त्वाची'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 10, 2019 12:49 PM IST

ताज्या बातम्या