'...तर पाकिस्तान अण्वस्त्र वापरायलाही कमी करणार नाही'; 'या' मंत्र्यानी दिला इशारा

'...तर पाकिस्तान अण्वस्त्र वापरायलाही कमी करणार नाही';  'या' मंत्र्यानी दिला इशारा

एअरस्ट्राईकनंतर आता भारताविरोधात पराजयाच्या भीतीने तिरीमिरीत पाकिस्तान अण्वस्त्रसुद्धा वापरायला पुढे-मागे पाहणार नाही, असा इशारा या मंत्र्यानं दिला आहे.

  • Share this:

अमृतसर, 4 मार्च : भारतीय सैनिक आणि निष्पाप नागरिक यांना मारलं, तर भारत कदापि सहन करणार नाही, हा संदेश ताज्या एअरस्ट्राईकनंतर पाकिस्तानपर्यंत स्पष्टपणे पोहोचला आहे. आता भारताविरोधात पराजयाच्या भीतीने तिरीमिरीत पाकिस्तान अण्वस्त्रसुद्धा वापरायला पुढे-मागे पाहणार नाही, असा इशारा पंजाबचे मुख्यमंत्री आणि माजी सैन्य अधिकारी कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी दिला आहे.

भारताने केलेल्या एअरस्ट्राईकमध्ये पाकिस्तानचे किती दहशतवादी मारले गेले याविषयी सुरू असलेल्या वादावादीबद्दल आपल्याला काही बोलायचं नाही, असं सांगत कॅप्टन अमरिंदर म्हणाले, "एक मेला की 100 यात अर्थ नाही. जो संदेश पाकिस्तानात जायला हवा होता, तो स्पष्टपणे आणि थेट पोहोचला आहे, हे महत्त्वाचं. आपल्या नागरिकांची आणि सैनिकांची हत्या भारत अजिबात सहन करणार नाही."

"भारताची जर समोरासमोर युद्ध झालं, तर पाकिस्तान कदापि जिंकू शकणार नाही. पराभवाच्या या जाणिवेमुळे कदाचित तो देश अण्वस्त्राचा वापरही करू शकतो", असं अमरिंदर सिंग म्हणाले.

जगाने वाळीत टाकलं आणि पराजयाच्या भावनेनं ग्रासलं तर त्या तिरीमिरीत पाकिस्तान अण्वस्त्राचा वापर करू शकतो, असा इशारा त्यांनी दिला.


AIRSTRIKE मध्ये राफेल असतं तर चित्र वेगळं असतं - नरेंद्र मोदी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 4, 2019 06:27 PM IST

ताज्या बातम्या