VIDEO : पाकचे संरक्षण मंत्री म्हणतात, रात्रीच्या अंधारामुळे आम्ही हल्ला केला नाही'

VIDEO : पाकचे संरक्षण मंत्री म्हणतात, रात्रीच्या अंधारामुळे आम्ही हल्ला केला नाही'

पाकिस्तानने नेहमीप्रमाणे असा हल्ला झालाच नाही असा कांगावा सुरू केला आहे.

  • Share this:

26 फेब्रुवारी : भारतीय वायू दलाने पाकिस्तान व्याप्त भागात घुसून जैश-ए- मोहम्मदच्या तळावर जोरदार बाॅम्बवर्षाव केला. एकीकडे भारतात या हल्ल्याचा जल्लोष सुरू आहे तर दुसरीकडे पाकिस्तानने नेहमीप्रमाणे असा हल्ला झालाच नाही असा कांगावा सुरू केला आहे. आता भर भर म्हणजे, पाकिस्तानचे संरक्षण मंत्री परवेज खटक यांनी अत्यंत गंमतीशीर उत्तर दिले आहे.

'जेव्हा भारतीय वायू दलाने हल्ला केला तेव्हा आमचे सैन्य त्यांना उत्तर देण्यासाठी तयार झाले होते. परंतु, रात्रीचा काळोख असल्यामुळे आम्ही हल्ला करू शकलो नाही' असा खुलासाच परवेज खटक यांनी केला.पत्रकार नायला इनायत यांनीही हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. यात परवेज खटक यांनी भारतीय हल्ल्याला दुजोरा दिला. 'आम्ही प्रत्युत्तर देणार होतो पण काळोख होता, त्यामुळे नुकसान काय झाले याचा अंदाज येऊ शकला नाही' असंही खटक म्हणाले.

जेव्हा हा हल्ला झाला त्यानंतर किती नुकसान झाले याचा अंदाज घेण्याची पाकिस्तानी वायू दलाने वाट पाहिली होती.परंतु, भारताने पुन्हा असं कृत्य केलं तर आम्ही जशास तसे उत्तर देऊ असा इशाराही खटक यांनी दिला.

त्याचवेळी त्यांच्या बाजूला बसलेले पाकचे परराष्ट्रमंत्री  शाह मोहम्मद कुरैशी यांनी, 'पाक सैन्याचे लढाऊ विमानांनी आकाशाला भरारी घेतली होती, ते पाहून भारतीय विमानं माघारी परतले', असा दावा त्यांनी केला.

दरम्यान, पाकिस्तानच्या सिनेटमध्ये विरोधकांनी पंतप्रधान इम्रान खान यांना धारेवर धरत शेम शेमच्या घोषणा दिल्या.

जैश-ए-मोहम्मदच्या गडाला खिंडार

पहाटे साडेतीनच्या सुमारास भारतीय वायूदलाच्या मिराज-२००० या विमानांच्या ताफ्याने बालाकोट परिसरातील जैश-ए-मोहम्मदच्या तळांवर तुफान बॉम्बफेक केली होती. यावेळी साधारण १००० किलो स्फोटकांचा वापर करण्यात आला. या हल्ल्यात जैश-ए-मोहम्मदची मोठी हानी झाली आहे. गुप्तचर यंत्रणांच्या माहितीनुसार, बालाकोट परिसरातील जैश-ए-मोहम्मदच्या तळावर शस्त्रास्त्रांचा अगणित साठा होता. मात्र, भारतीय वायूदलाच्या हल्ल्यात हा शस्त्रांचा साठा पूर्णपणे उद्ध्वस्त झाला. यामध्ये २०० एके सीरीजच्या रायफल्स, अगणित काडतुसे, ग्रेनेड, स्फोटके आणि डिटोनेटर अशा साधनांचा समावेश होता. या हल्ल्यात मसूद अजहरचा मेव्हणा आणि जैश ए मोहम्मदचा प्रमुख नेता मौलाना युसूफ अजहर याच्यासह 200 हून अधिक दहशतवादी ठार झाल्याचे वृत्त आहे. त्यामुळे जैश-ए-मोहम्मदला मोठा झटका बसल्याचे मानले जात आहे. या हल्ल्यामुळे भारताने पुन्हा एकदा जगाला आपले लष्करी सामर्थ्य दाखवून दिले आहे.


====================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 26, 2019 10:44 PM IST

ताज्या बातम्या