Elec-widget

पाकिस्तानने केलं शस्त्रसंधीचं पुन्हा उल्लंघन, भारताचं चोख प्रत्युत्तर

पाकिस्तानने केलं शस्त्रसंधीचं पुन्हा उल्लंघन, भारताचं चोख प्रत्युत्तर

शांततेच्या गप्पा मारत असतानाच सीमेवर पाकिस्तानच्या कुरापती सुरुच आहेत.

  • Share this:

श्रीनगर 1 मार्च  : अभिनंदन भारतात परतत असतानाच पकिस्तानने शुक्रवारी पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन करत भारतीय चौक्यांवर गोळीबार आणि तोफगोळ्यांचा मारा केला. नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानने ही आगळीक केली. भारतानेही पाकिस्तानच्या या कुरापतीला चौख प्रत्युत्तर दिलं आहे.

शांततेच्या गप्पा मारत असतानाच सीमेवर पाकिस्तानच्या कुरापती सुरुच आहेत. सायंकाळी नौशेरा भागात पाकिस्तानने शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं. त्याला भारताने जोरदार प्रत्युत्तर दिलं. गेल्या गेल्या आठ दिवसांपासून भारतीय चौक्यांवर गोळीबार करत असून दोन दिवसांमध्ये पाकिस्तानने 36 पेक्षा जास्त वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन केल्याची माहिती लष्करी अधिकाऱ्यांनी दिली आहे.

विंग कमांडर अभिनंदनच्या सुटकेमागची INSIDE STORY

अतुलनीय शौर्य आणि धैर्य दाखवत पाकिस्तानच्या F-16 या लढाऊ विमानाला अस्मान दाखवणारा अभिनंदन पाकिस्तानच्या ताब्यात राहिल्यानंतर दोन दिवसांनी भारतात परत येतोय. जागतिक दबाव आणि मुत्सद्दगीरीच्या बळावर अभिनंदनला भारताने सोडायला भाग पाडले आणि पंतप्रधान इम्रान खान यांनी त्यांच्या सुटकेची घोषणा केली. पण पडद्यामागे मोठं नाट्य घडत होतं.

27 फेब्रुवारीला अभिनंदन पाकिस्तानच्या ताब्यात सापडल्यानंतर भारताचे 'मिशन अभिनंदन' सुरू झालं. जिनिव्हा करारानुसार पकिस्तानने भारताला औपचारिकपणे अभिनंदन ताब्यात असल्याची माहिती दिली. नंतर भारताने त्याला तातडीन सोडा अशी विनंती पाकिस्तानला केली. त्यानंतर आंतरराष्ट्रीय समुदायाला भारताने सर्व माहिती द्यायला सुरुवात केली.

Loading...

भारताने अमेरिक, ब्रिटन, फ्रांन्स आणि सऊदी या देशांना माहिती दिली. त्या सर्व देशांनी अभिनंदनची सुटका करावी यासाठी पाकिस्तानवर दबाव आणला. त्यानंतर भारताने सर्व सार्क देशांनाची विश्वासात घेतलं. त्यांनीही पाकिस्तानवर दबाव आणला.

अमेरिका, ब्रिटन आणि सऊदी अरेबीयाने पाकिस्तानला सांगितले की, अभिनंदनला सोडलं नाही तर भारताला शांत करणे कठिण जाईल आणि सीमेवर तणाव वाढेल. त्यानंतर आंतरराष्ट्रीय दबाव वाढत असल्याने शेवटी तणाव निवळण्यासाठी पंतप्रधान इम्रान खान यांनी अभिनंदनच्या सुटकेची घोषणा केली.

त्याचबरोबर अभिनंदनचे वडिल हवाई दलात अनेक वर्ष होते. त्यांचेही पाकिस्तानातल्या अनेक वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांशी चांगले संबंध आहेत. त्यामुळे अभिनंदन हा त्यांचा मुलगा आहे हे त्यांना कळाल्यावर त्या संबंधांचाही परिणाम झाला असल्याचं सूत्रांनी सांगितलं. या सगळ्यांचा परिणाम म्हणजे दोन दिवसातच अभिनंदनला सोडावं लागलं.

Special Report : अभिनंदन यांची विनाशर्त सुटका करणारा भारताचा 'जेम्स बॉन्ड'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: pakistan
First Published: Mar 1, 2019 05:15 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...