S M L

काश्मीरमध्ये पाकिस्तानच्या गोळीबारात बीएसएफचे 2 जवान शहीद

काही दिवसांपूर्वीच शस्त्रसंधीचं तंतोतंत पालन करायचं, असं भारत आणि पाकच्या डीजीएमओंमध्ये ठरलं होतं.

Sonali Deshpande | Updated On: Jun 3, 2018 12:14 PM IST

काश्मीरमध्ये पाकिस्तानच्या गोळीबारात बीएसएफचे 2 जवान शहीद

काश्मीर, 03 जून : काश्मीरमध्ये पाकिस्तानच्या गोळीबारात बीएसएफचे 2 जवान शहीद झाले. अखनूर सेक्टरमध्ये काल संध्याकाळपासून जोरदार गोळीबार सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच शस्त्रसंधीचं तंतोतंत पालन करायचं, असं भारत आणि पाकच्या डीजीएमओंमध्ये ठरलं होतं. पण पाकिस्ताननं आधीप्रमाणंच विश्वासघात केला, आणि गोळीबार सुरू केला. कुमार पांडे आणि सत्यनारायण यादव अशी शहीद झालेल्या जवानांची नावे आहेत.

बीएसएफच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी सैन्याकडून आंतरराष्ट्रीय सीमेवर अखनूर सेक्टरमधील बीएसएफच्या चौक्यांवर गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात दोन जवान हुतात्मा झाले आहेत. अखनूर सेक्टरमधील प्रगवाल भागात पाककडून गोळीबार करण्यात आला. बीएसएफकडूनही पाकिस्तानच्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देण्यात आले. उपनिरीक्षक दर्जाचे हे दोन्ही जवान गंभीर जखमी झाले होते. त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, त्यांचा मृत्यू झाला.

कुमार पांडे आणि सत्यनारायण यादव अशी या जवानांची नावे आहेत. पाकिस्तानकडून बीएसएफकडे गोळीबार न करण्याची विनंती केल्यानंतर पाककडून पुन्हा एकदा गोळीबार करण्यात आला आहे. रमजान महिन्यात भारत सरकारने सीमेवर गोळीबार न करण्याचा निर्णय घेतल्यानंतरही पाकिस्तानकडून आगळीक सुरुच आहे. पाककडून यापूर्वीही सीमेवरील गावांवर गोळीबार करण्यात आला आहे. यामध्ये अनेक नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 3, 2018 12:14 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

Live TV

News18 Lokmat
close