पाकिस्तानने केलं पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन, BSFचा अधिकारी शहीद

पाकिस्तानने केलं पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन, BSFचा अधिकारी शहीद

  • Share this:

नवी दिल्ली 1 डिसेंबर: जम्मू आणि काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir)  गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली पाकिस्तानची (Pakistan) आगळीक सुरूच आहे. पाकिस्तानने मंगळवारी पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं असून त्यात एक BSFचा अधिकारी शहीद झाला आहे. जम्मू-कश्मीर (Jammu Kashmir) च्या पुंछ जिल्ह्यात पाकिस्तानने हा गोळीबार केला. मेंढर सेक्टरच्या तारकुंडी परिसरात हा गोळीबार करण्यात आला होता. चिथावणी देण्यासाठीच पाकिस्तान हे कृत्य करत असल्याचंही बोललं जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानच्या कुरापती वाढताना दिसत आहे. घुसखोरीचा प्रयत्न असो किंवा शस्त्रसंधीचं उल्लंघन भारताकडून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलं जात आहे. 27 नोव्हेंबरलाही पाकिस्तानने केलेल्या गोळीबारामध्ये 2 जवान शहीद झाले होते.

काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेजवळ (LoC) पाकिस्तानचे (Pakistan) ड्रोन्स अनेकदा दिसून आले आहेत. मात्र सोमवारी पाकिस्तानचं लढाऊ विमान सीमेजवळ दिसल्याने खळबळ उडाली होती. हे विमान चुकून आलं की जाणिवपूर्वक आलं होतं याची माहिती आता लष्कर घेत आहे. सोमवारी सकाळी हे विमान दिसलं आहे. त्या विमानाने सीमा रेषेचा भंग केला नसला तरी ते सीमारेषे जवळ आल्याने हा गंभीर प्रकार समजला जातो.

नियंत्रण रेषेजवळ तैनात असलेल्या जवानांना या विमानांचा आवाज आला आणि धूरही दिसला. त्यानंतर अलर्ट झालेल्या लष्कराने त्या घटनेचा अभ्यास सुरू केला आहे. हे विमान प्रशिक्षण देणारं होतं की तैनात केलेलं होतं, त्यावर काही हेरगिरीची उपकरणं होती का या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आता केला जात आहे.

गेल्या काही महिन्यांंपासून काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानने ड्रोनच्या माध्यमातून शस्त्रपुरवढा केल्याच्या घटना उघडकीस आल्या होत्या. त्याच बरोबर त्याम माध्यमातून ड्रग्जची तस्करीही केली जात होती.

Published by: Ajay Kautikwar
First published: December 1, 2020, 6:21 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading