भारताविरोधात F-16चा वापर पाकिस्तानला पडणार महागात; अमेरिकेनं उचललं मोठं पाऊल

भारताविरोधात F-16चा वापर पाकिस्तानला पडणार महागात; अमेरिकेनं उचललं मोठं पाऊल

एफ-16 विमानांचा वापर भारताविरोधात केल्यानं आता अमेरिका पाकिस्तानविरोधात मोठं पाऊल उचलू शकते.

  • Share this:

वॉशिंग्टन, 2 मार्च : भारताविरोधात एफ-16 विमानांचा वापर करणं पाकिस्तानला चांगलंच महागात पडू शकतं. कारण, भारतानं अमेरिकेकडे पाकिस्ताननं भारताविरोधात एफ-16 विमानाचा वापर केल्याचे पुरावे सोपवले आहेत. भारतानं पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये एअर स्ट्राईक करत दहशतवाद्यांचा खात्मा केला. त्यानंतर पाकिस्ताननं देखील भारतावर हवाई हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण, भारतानं पाकिस्तानचा सारा प्रयत्न हाणून पाडला. यावेळी पाकिस्ताननं भारताच्या लष्करी तळांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न देखील केला. यावेळी पाकिस्ताननं अॅमरॉन मिसाईल देखील डागलं. त्याचे पुरावे देखील आता भारतानं गोळा करून अमेरिकेकडे सोपवले आहेत.

अॅमरॉन हे मिसाईल केवळ एफ-16 या लढाऊ विमानावरूनच डागलं जावू शकतं. भारताविरोधात एफ-16 विमानांचा वापर करत पाकिस्ताननं अमेरिकेसोबत केलेल्या कराराचा भंग केला आहे. त्यामुळे अमेरिका आता नाराज झाली असून त्यांनी चौकशीला देखील सुरूवात केली आहे.

काय आहे करार?

पाकिस्ताननं 2016मध्ये अमेरिकेकडून एफ-16 या विमानांची खरेदी केली आहे. यावेळी अमेरिकेनं पाकिस्तानपुढे विमानांचा वापर केवळ देशात केला जाईल, अशी अट ठेवली होती. पण, पाकिस्ताननं भारताविरोधात विमानांचा वापर करून अमेरिकेसोबत केलेल्या करारांचा भंग केला आहे. त्यामुळे अमेरिका आता नाराज झाली आहे. भारतानं देखील त्याबाबतचे पुरावे अमेरिकेकडे सोपवले असून त्यादृष्टीनं आता अमेरिकेनं तपास देखील सुरू केला आहे. या साऱ्या गोष्टी पाहता आता एफ- 16 विमानांचा वापर आता पाकिस्तानला महागात पडू शकतो.

एफ-16 विमानं देताना अमेरिकेला होती चिंता

दरम्यान, पाकिस्तानला एफ-16 विमानं देताना अमेरिकेला वाटणारी चिंता आता खरी ठरली आहे. पाकिस्तान भारताविरोधात एफ-16 विमानांचा वापर करेल अशी चिंता अमेरिकेला होती. 2016मध्ये बराक ओबामा राष्ट्रध्यक्ष असताना पाकिस्तानला एफ-16 विमानं देताना बंदी देखील घातली गेली होती.

पण, आता भारतानं पुरावे दिल्यानं पाकिस्तानला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

'राजकारण सोडा राहुलबाबा; 26/11च्या हल्ल्यानंतर तुम्हीही बरंच काही करू शकला असता'

First published: March 2, 2019, 3:54 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading