युद्धाच्या धमकीनंतर पाकने भारतासमोर टेकले गुडघे, परराष्ट्र मंत्र्यांनी घेतलं नमतं

काश्मीरमध्ये कलम 370 हटवल्यानंतर बिथरलेल्या पाकिस्तानने नुकतीच गजनवी या क्षेपणास्त्राची चाचणी घेतली.

News18 Lokmat | Updated On: Aug 31, 2019 01:58 PM IST

युद्धाच्या धमकीनंतर पाकने भारतासमोर टेकले गुडघे, परराष्ट्र मंत्र्यांनी घेतलं नमतं

नवी दिल्ली, 31 ऑगस्ट : जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटवण्याच्या निर्णयानंतर पाकिस्तानने त्यांच्या कुरापती सुरू केल्या होत्या. पाककडून भारतावर अनेक आरोप केले गेले. तसेच भारताला युद्धाची धमकीसुद्धा दिली. दरम्यानच्या काळात पाकने गजनवी या क्षेपणास्त्राची चाचणी घेतली. मात्र, आता पाकने भारतासमोर गुडघे टेकले आहेत.

पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी म्हटलं की, पाकिस्तानने दोन्ही देशांमध्ये चर्चा करायला कधी नकार दिलेला नाही. आम्ही भारताकडून तयार करण्यात आलेल्या वातावरणात चर्चा पाहू शकत नाही. या मुद्द्यावर बाहेरच्या कोणाचा हस्तक्षेप कौतुकास्पद असेल असंही कुरेशी म्हणाले.

काश्मीरमध्ये अटक केलेल्या राजकीय नेत्यांच्या सुटकेनंतर भारतासोबत चर्चा सुरू करता येईल. यामध्ये काश्मीरच्या मुद्द्यावर भारत, पाक आणि काश्मीरी लोकांमध्ये चर्चा होऊ शकते असे कुरेशी यांनी म्हटलं आहे. काश्मीरी नेत्यांना भेटण्याची परवानगी मला मिळायला हवी. कारण त्यांच्याशी संवाद साधता येईल.

पाकचे पंतप्रधान इमरान खान यांनी सांगितलं की, त्यांचे सरकार भारतासोबत कोणतीही चर्चा करणार नाही. त्यांचा दावा आहे की, जम्मू काश्मीरमध्ये भारताच्या निर्णयानं दोन्ही अणुशक्ती असलेल्या देशांमध्ये तणाव निर्माण होऊ शकतो असा त्यांचा दावा आहे.

भारतानं जम्मू काश्मीरमधील विशेष दर्जा हटवण्याचा निर्णय बदलला तर पाकचे सैन्य मागे घेऊ. त्यानंतर चर्चा होऊ शकते. काश्मीरवर संवादात बाजू मांडण्यासाठी सर्वजण सहभागी असावेत. त्यात काश्मीरींचे मतही विचारात घेतलं पाहिजे असंही इमरान खान यांनी म्हटलं होतं.

Loading...

VIDEO: केमिकल कंपनीत बॉयलरचा भीषण स्फोट, घटनास्थळावरील LIVE VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 31, 2019 01:58 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...