'पाकिस्तानने पहाटे केलेलं ट्वीट हाच एअर स्ट्राइकचा पुरावा', मोदींची न्यूज 18 ला खास मुलाखत

'पाकिस्तानने पहाटे केलेलं ट्वीट हाच एअर स्ट्राइकचा पुरावा', मोदींची न्यूज 18 ला खास मुलाखत

भारताने केलेल्या एअर स्ट्राइकबद्दल पाकिस्तानने पहाटे 5 वाजता घाईघाईने ट्वीट केलं. त्यामुळे एअर स्ट्राइकचा पुरावा पाकिस्ताननेच दिला आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे. नेटवर्क 18 ला त्यांनी खास मुलाखत दिली.

  • Share this:

नवी दिल्ली, 9 एप्रिल : लोकसभा निवडणुकीच्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नेटवर्क 18 ला खास मुलाखत दिली. नेटवर्क 18 चे एडिटर इन चीफ आणि सीईओ राहुल जोशी यांनी त्यांची मुलाखत घेतली. बालाकोटमध्ये दहशतवादी तळावर हल्ला केल्याचे पुरावे भारताकडे आहेत का ? असं त्यांना विचारण्यात आलं. योग्य वेळ आली की हे पुरावे देशासमोर ठेवणार का ? असाही प्रश्न त्यांना विचारण्यात आला. पंतप्रधान मोदींनी याला थेट उत्तर दिलं. पाकिस्तानसोबतच त्यांनी काँग्रेसवरही निशाणा साधला.

एअर स्ट्राईकच्या मुद्द्यावर या खास मुलाखतीत मोदी म्हणाले, 'पाकिस्तानने या हल्ल्याबद्दल घाईघाईत पहाटे सकाळी 5 वाजता ट्वीट केलं हाच याचा मोठा पुरावा आहे.आपल्या सैन्याच्या पराक्रमाचा हा मोठा पुरावा आहे.'

पाकिस्तानवर केलेल्या हवाई हल्ल्यात 250 दहशतवादी मारले गेले. भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनीच हा दावा केला होता. त्यावर उत्तर देताना मोदी म्हणाले, 'जेव्हा आपण पुराव्याबद्दल बोलतो तेव्हा पाकिस्तान हाच मोठा पुरावा आहे. आमच्यावर असा हल्ला झाला हे पाकिस्तानने भल्या पहाटे ट्वीट करण्याचं कारणच काय, असा प्रश्नही मोदींनी विचारला. आम्ही तर गप्प होतो पण पाकिस्तानला हे का सांगावं लागलं ? म्हणजेच खुद्द पाकिस्ताननेच हल्ल्याचा पुरावा दिला आहे. या हल्ल्याबद्दल भारत सरकार आणि आपल्या लष्कराने काहीही म्हटलेलं नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधक आणि काँग्रेसवरही निशाणा साधला. याआधीही युद्ध झाली पण कुणी अशा भाषेत टीका केलेली नाही. कितीतरी वेळा कारवाई झाली पण कधीच कुणी अशी टीका केली नव्हती. पण सत्तेसाठी हपापलेल्या काँग्रेसने त्यांची मर्यादा सोडली आहे. म्हणूनच ते अशा प्रकारची भाषा बोलतात, असं ते म्हणाले.

================================================================================================================================================================

VIDEO: पराभवाच्या भीतीने महाआघाडीतले पक्ष एकत्र; मोदींचा महाआघाडीला टोला

First published: April 9, 2019, 4:20 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading