योग दिनाला पाकिस्तानची 'डुलकी', चुकून ट्विट केला 'तिरंगा'

योग दिनाला पाकिस्तानची 'डुलकी', चुकून ट्विट केला 'तिरंगा'

पाकिस्तानातही योग दिवस झाला साजरा, मात्र एका चुकीमुळे झालं हसं

  • Share this:

नवी दिल्ली, 21 जून : भारताच्या पुढाकाराने सुरू झालेला योग दिवस हा आज सर्व जगात साजरा केला जातो. पाकिस्तानमध्येही हा दिवस साजरा केला गेला. या पार्श्वभूमीवर पाकिस्तान सरकारच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एक ट्विट करण्यात आलं. यात योगाचं महत्त्व सांगून एक लोगोही टाकण्यात आला होता. यासाठी जो हॅशटॅग वापरण्यात आला होता. त्यात एक मोठी चूक झाली. त्या हॅशटॅग सोबत तिरंगाही आला होता. नंतर ही चूक लक्षात आल्यानंतर ते ट्विट डिलीट करून नवं ट्विट करण्यात आलं.

काय आहे पाकच्या ट्विटमध्ये

पाचवा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात येत आहे. या वर्षीचं उद्दीष्ट हे 'पर्यावरणासाठी योग असं आहे.' योग ही एक प्राचीन शारीरिक, मानसिक आणि अध्यात्मिक प्रक्रिया आहे. आज सर्व जगभर योग विविध स्वरुपात केला जातो आणि दिवसेंदिवस त्याची लोकप्रियताही वाढत आहे, असं ट्विटमध्ये म्हटलंय.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच वर्षांपूर्वी संयुक्त राष्ट्रात दिलेल्या पहिल्याच भाषणात सर्व जगाने 21 जून हा पर्यावरण दिन म्हणून साजरा करावा असं आवाहन केलं होतं. भारताच्या या ठरावाला जगातल्या जवळपास सर्वच देशांनी पाठिंबा दिला होता. त्यानंतर दरवर्षी हा दिवस जगभर योग दिवस म्हणून साजरा केला जातो.

पाकिस्तान सीमेवर टोळधाड

पाकिस्तान सीमेलगत असलेल्या शेतकऱ्यांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागू शकतो. 26 वर्षानंतर येणाऱ्या या संकटामुळे शेतकऱ्यांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागू शकतो. कारण, टोळधाडीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होऊ शकते. पाकिस्तानमधून येणाऱ्या या टोळधाडीमुळे शेतकऱ्यांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे भारताच्या चिंतेत भर पडली आहे. या प्रश्नावर भारतानं पाकिस्तानी अधिकाऱ्यांशी बुधवारी चर्चा देखील केली. जवळपास 4 तास या बैठकीमध्ये चर्चा झाली. 1993मध्ये अशाच प्रकारची टोळधाड पडली होती. त्यानंतर आता शेतकऱ्यांना टोळधाडीचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे पाकिस्तान सीमेलगत असलेल्या शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सरकार देखील आता या समस्येशी सामना कसा करायचा यावर विचार करत आहे.

पाकिस्तानमध्ये टोळांची समस्या

पाकिस्तानमध्ये देखील टोळांचा उपद्रव वाढला आहे. त्यांच्या नियंत्रण मिळवण्यासाठी विमानातून औषध फवारणी करण्यात आली. शिवाय, गरज पडल्यास आणखी एक विमान सज्ज ठेवण्यात आलं आहे. त्यानंतर ही टोळधाड आता भारताच्या वाटेवर आहे. त्यामुळे पाकिस्तानी अधिकाऱ्यांशी भारतानं चर्चा केली. 4 तास चाललेल्या चर्चेअंती पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी योग्य ती पावलं उचलण्याचं आश्वासन दिलं आहे.

First published: June 21, 2019, 6:53 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading